मुंबई : एलआयसी (LIC) ही विमा कंपनी संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येकाला या संस्थेबाबत माहिती आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांनी वेगवेगळे विमा काढलेले आहेत. या विम्यांच्या (LIC Policy) माध्यमातून एलआयसीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. मात्र हा निधी नेमका कोठे जातो? याची कल्पना अनेकांना नसते. याच पार्श्वभूमीवर आपण एलआयसीकडे जमा झालेले पैसे नेमके कोठे जातात? एलआयसी या पैशांचं काय करते? हे जाणून घेऊ या...


लोक एलआयसीमध्ये पैसे गुंतवतात. पॉलिसीच्या मॅच्यूरिटीनंतर एलआयसी आपल्या ग्राहकांना मूळ ठेवीसह अतिरिक्त रक्कम देते. त्या-त्या योजनेच्या नियमांनुसार एलआयसी आपल्या ग्राहकांना अतिरिक्त पैसे देते. हे अतिरिक्त पैसे एलआयसी आपल्या खिशातून देत नाही. ग्राहकांनी दिलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून एलआयसी जास्तीचा नफा मिळवते आणि ग्राहकांना ठरल्यानुसार अतिरिक्त पैसे देते. गेल्या कित्येक वर्षांपासून एलआयसी हेच सूत्र वापरते. 


एलआयसीचा पैसा नेमका कोठे जातो? 


ग्राहकांकडून जमा झालेला पैसा एलआयसी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवते. माध्यमांत असलेल्या माहितीनुसार एलआयसीने एकूण पैशांतील 67 हिस्सा बॉन्ड्समध्ये गुंतवलेला आहे. एलआयसीने साधारण 4.7 लाख कोटी रुपये इक्विटीमध्ये गुंतवलेले आहेत. 1 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या इन्वेस्टमेंट प्रॉपर्टीजमध्ये गुंतवलेले आहेत. उर्वरित रक्कम ही म्युचुअल फंड्स, सब्सिडिअरीज, डेट सिक्योरिटीज यामध्ये एलआयसीने पैसे गुंतवलेले आहेत. या गुंतवणुकीतून एलआयसी नफा मिळवते आणि आपल्या ग्राहकांना सांगितल्यानुसार परतावा देते.  


विमा क्षेत्रात एलआयसी किंग 


एलआयसीजवळ जवळपास एक लाख कर्मचारी आहेत. संपूर्ण भारतभरात या संस्थेकडे साधारण 13 लाख कर्मचारी आहेत. भारतातील संपूर्ण विमा एजंट्सपैकी साधारण 55 टक्के विमा एजंट्स हे फक्त एलआयसीकडे आहेत. विमा योजनांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास एलआयसी एंडोमेंट, टर्म इन्शुरन्स , चिल्ड्रन, पेन्शन, मायक्रो इन्शुरन्स असे वेगवेगळे विमे या कंपनीकडून दिले जातात. 31 डिसेंबर 2023 मध्ये विमा कंपन्यांच्या एकूण बाजारापैकी साधारण 58.9 टक्के बाजार हा एलआयसीने व्यापलेला होता. याआधीच्या वर्षात हे प्रमाण 65.4 टक्के होते. गेल्या कित्येक वर्षांपासून एलआयसी अशाच प्रकारे लोकांचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून आपल्या ग्राहकांना समाधानकारक सेवा देते.


हेही वाचा :


पीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर आधी बदललेला 'हा' नियम वाचा, होऊ शकतो मोठा फायदा!


अब्जाधीश एलॉन मस्क भारतात येणार, 'हे' शेअर्स रॉकेटप्रमाणे भरारी घेणार?


'लोन ॲप्स'च्या नादाला लागण्याआधी सावधान, होऊ शकते मोठी फसवणूक; 'अशी' घ्या काळजी!