एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो अकाऊंट चेक करा...खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana : भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल (शुक्रवारी) 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यात देखील कालपासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहि‍णींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत. (Ladki Bahin Yojana) 

भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल (शुक्रवारी) 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यात देखील काल (शुक्रवारी) पासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा हफ्ता मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

आदिती तटकरेंनी काय म्हटलंय? 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. अशी सोशल मिडिया पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावरती शेअर केली आहे. 

एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी उशीर का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे. 

 एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल. यापूर्वी लाडक्या बहि‍णींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी महिन्याचे 1500  आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते. आता लाडक्या बहि‍णींना एप्रिल महिन्याच्या हप्ता काही  ठिकाणी मिळाला आहे, तर काही जणांना अद्याप प्रतिक्षा आहे.

किती लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार?

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी  47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget