Bumper Mutual Fund Return:  जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. SIP द्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमध्येही बाजार जोखीम असलेली गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी, अधिकाधिक परतावा मिळवण्यासाठी अनेक नियम आहेत. 


करोडपती होण्यासाठी आहे हा फॉर्म्युला 


म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक चांगले सूत्र आहे. त्याला 15 x 15 x 15 नियम (15 x 15 x 15 rule)असे म्हणतात. या म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणुकीमध्ये एक गुंतवणुकदार 15 वर्षांसाठी दरमहा 15 हजार रुपयांची गुंतवणूक करून करोडपती होऊ शकतो. या नियमानुसार, कोणत्याही गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत असेल तर किमान परतावा हा 15 टक्के असणार. 


याचाच अर्थ 15 वर्षात कोणीही करोडपती होऊ शकतो. Mutual fund calculator नुसार, एखादी व्यक्ती आपल्या मॅच्युरिटी रक्कम दुप्पटही करू शकतो. वार्षिक परतावा दर 15 टक्के स्टेट-अप राहिल्यास 15 वर्षात दोन कोटीहून अधिक रक्कम त्याला मिळू शकते.  


या उदाहरणाद्वारे समजू घ्या


जर एखादी व्यक्ती 15 वर्षांसाठी 15 हजार रुपयांची SIP गुंतवणूक करत असेल तर गुंतवणूक रक्कम 27 लाख इतकी होईल. तर, अशा स्थितीत 15 टक्के वार्षिक परतावा मिळत असल्याचे गृहित धरल्यास गुंतवणुकीवर 74,52,946 इतकी रक्कम परतावा म्हणून मिळू शकते. 


याचाच अर्थ तुमचे 27 लाख रुपये 15 वर्षानंतर 1,01,52,946 रुपये इतके होतील. त्यामुळे 15 हजार रुपये दरमहा रक्कम गुंतवल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता. 


(कोणत्याही फंडातील गुंतवणुकीचा सल्ला येथे एबीपी न्यूजने दिलेला नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. एनएव्हीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये चढ-उतार होऊ शकतात. म्युच्युअल फंडाची भूतकाळातील कामगिरी योजनांच्या भविष्यातील कामगिरीचे प्रतिबिंबित करणे आवश्यक नाही. म्युच्युअल फंड कोणत्याही योजनेंतर्गत कोणत्याही लाभांशाची हमी किंवा हमी देत ​​नाही आणि त्याची उपलब्धता आणि पर्याप्ततेच्या अधीन आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा)


इतर महत्त्वाच्या बातम्या:


'या' दोन सरकारी कंपन्याची मालमत्ता विक्रीला; मोदी सरकार उभारणार 1100 कोटी!


PayTM listing : शेअर बाजारात पेटीएमच्या 'Listing Loss'नंतर पुढे काय?


 


देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha