Savitri Jindal: दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन देशात आणि जगात साजरा केला जातो. या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला अशा व्यावसायिक महिलेबद्दल माहिती सांगणार आहोत, की ज्या कधीही कॉलेजमध्ये गेल्या नाहीत. पण आज त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एवढेच नाही तर जगभरातील श्रीमंतांच्या यादीतही त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल (
Jindal Group Savitri Jindal) असं त्याचं नाव आहे.


सावित्री जिंदाल यांचे जीवन संघर्षमय आहे. त्या 55 ​​वर्षांच्या असताना त्यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांचे निधन झाले. ओमप्रकाश हे जिंदाल ग्रुपचे संस्थापक होते. पतीच्या निधनानंतर सावित्री पूर्णपणे खचल्या होत्या. तरीही त्यांनी हार मानली नाही. एकट्या आपल्या 9 मुलांचा सांभाळ करत पुढे सरसावल्या. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2023 नुसार, जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्या 94 व्या क्रमांकावर आहे. 


सावित्री जिंदाल यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर


सावित्री जिंदाल यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर (13,91,31,82,50,000 रुपये) आहे. 1970 मध्ये जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पतीच्या निधनानंतर त्या संपूर्ण व्यवसाय सांभाळत आहे. सावित्री जिंदाल सध्या 73 वर्षांच्या आहेत. त्यांच्या साधेपणासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी कॉलेजचे शिक्षणही घेतलं नाही. असे असतानाही पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांने संपूर्ण व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळला. सावित्री जिंदाल यांच्यासाठी हे सोपे नव्हते. जिंदाल कुटुंबात बहुतांश महिला घरातील जबाबदाऱ्या सांभाळतात. तर पुरुष बाहेरची कामे पाहतात. मात्र, पतीचा निधनानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी सावित्री जिंदाल यांना कसरत करावी लागली.


हरियाणातील हिसार येथून व्यवसायाची सुरुवात


जिंदाल ग्रुपची स्थापना सावित्री जिंदाल यांचे दिवंगत पती ओम प्रकाश जिंदाल यांनी हरियाणातील हिसार येथे एक लहान देशी उत्पादक म्हणून केली होती. आज हा समूह भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक बनला आहे. सावित्री जिंदाल यांनी त्यांच्या 9 मुलांपैकी 4 मुलांना कंपनीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. जिंदाल समूहाने पोलाद, उर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट आणि इतर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ओपी जिंदाल ग्रुप अंतर्गत शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांमध्ये JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, JSW एनर्जी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टेनलेस आणि गुंतवणूक फर्म JSW होल्डिंग्स यांचा समावेश आहे.


कोणत्या मुलाला कोणती जबाबदारी?


व्यवसायाबाबत कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचे चार तुकडे केले आहेत. चार मुलांना चार जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पृथ्वीराज जिंदाल, सज्जन, रतन आणि नवीन जिंदाल यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. सावित्री जिंदाल यांचा मोठा मुलगा पृथ्वीराज हे जिंदाल सॉ कंपनीचे अध्यक्ष आहेत. तर सज्जन जिंदाल यांनी JWS कंपनीचा कार्यभार स्वीकारला आहे. धाकटा मुलगा नवीन जिंदाल यांच्याकडे जिंदाल स्टीलची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा मोठा भाऊ रतन जिंदाल हे कंपनीत संचालक आहेत. आज जिंदाल ग्रुपचा व्यवसाय देशभर आणि जगभर पसरलेला आहे. व्यवसायासोबतच सज्जन जिंदाल राजकारणातही सक्रिय आहेत.


जिंदाल स्टीलचा व्यवसाय सज्जन जिंदाल यांच्याकडे 


जिंदाल स्टील, जो आतापर्यंत स्टील व्यवसायात होता, सज्जन जिंदालने स्टीलपासून खाणकाम, ऊर्जा, क्रीडा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपर्यंत विस्तार केला. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या सज्जन जिंदाल यांनी कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार करण्याबरोबरच वडिलांचा राजकीय वारसा वाढवण्याचा निर्णय घेतला. 1982 मध्ये स्टील प्लांटमधून आपली कारकीर्द सुरु करणारे सज्जन जिंदाल आज भारतातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी JSW स्टील लिमिटेडचे ​​प्रमुख आहेत.


18 अब्ज डॉलर निव्वळ संपत्ती


सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. कोरोनाच्या काळात, 2019 आणि 2020 या वर्षांमध्ये, सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 50 टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांची संपत्ती तिपटीने वाढली आहे. सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती आज 25.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.


महत्वाच्या बातम्या:


श्रीमंत लोक कसा वाचवतात आयकर? कुठं मिळते तुम्हाला 100 टक्के सूट?