Income Tax News : देशात श्रीमंत लोकांची (Rich People) काही कमी नाही. त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यांची श्रीमंत वाढण्यामध्ये आयकर हा देखील महत्वाचा घटक आहे. कारण, हे श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात आयकर वाचवतात. श्रीमंत लोक नेमका आयकर कसा वाचवतात? अशी कोणती साधनं आहेत की, ज्याद्वारे आयकरात तुम्हाला 100 टक्के सूट मिळू शकते? याबदद्लची सविस्तर माहिती पाहुयात. 


आयकर कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यात तुम्हाला 100 टक्के रकमेवर कर सूट मिळते. श्रीमंत आणि अब्जाधीश लोक करोडो रुपयांची देणगी का देतात? याचा कधी विचार केला आहे का? पंतप्रधान मदत निधीतून श्रीमंत लोक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी का पुढे येतात? आयकर वाचवणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. आयकर कायद्याचे कलम 80G आणि त्याचे इतर भाग लोकांना विविध प्रकारच्या देणग्यांवर 50 ते 100 टक्के कर सूट देतात.


या ठिकाणी 100 टक्क्यांची कर सूट 


देशात अनेक सरकारी निधी, खासगी ट्रस्ट किंवा निधी आहेत, ज्यात दान केलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. याचा अर्थ असा की तुम्ही या निधीमध्ये कितीही रक्कम दान करता, ती रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी केली जाते आणि उत्पन्न पूर्णपणे करमुक्त राहते. देशातील या प्रकारचा सर्वात प्रसिद्ध फंड म्हणजे 'पंतप्रधान मदत निधी', ज्यामध्ये केलेल्या देणग्या पूर्णपणे करमुक्त असतात. याशिवाय मुख्यमंत्री मदत निधी, लेफ्टनंट गव्हर्नर रिलीफ फंड, नॅशनल डिफेन्स फंड, नॅशनल चिल्ड्रन्स फंड, नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, क्लीन गंगा फंड, नॅशनल स्पोर्ट्स फंड आणि नॅशनल कल्चरल फंड यासारख्या ट्रस्ट किंवा फंडांचा समावेश आहे.


राम मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांवरील करही वाचणार 


अयोध्येच्या राम मंदिरासाठी मुकेश अंबानी यांनी 2.51 कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी तुम्ही नुकतीच ऐकली असेल. तुम्हाला माहिती आहे का की तुम्हीही राम मंदिरासाठी दान केले तर दान केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम करमुक्त असणार आहे. राम मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्ट 50  टक्के कर सूट देण्याच्या श्रेणीत येते. जर तुम्हाला देणगीवर कर सवलत मिळवायची असेल, तर तुम्ही फक्त 2000 रुपये रोख दान करू शकता. यापेक्षा जास्त देणग्यांसाठी तुम्ही चेक, डीडी किंवा ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता. देणग्यांवर कर सूट मिळवण्यासाठी, तुम्हाला ITR मध्ये पुष्टी पावती दाखवावी लागेल. या पावतीमध्ये देणगी प्राप्तकर्त्याचा पॅन कार्ड आणि नोंदणी क्रमांक असावा. 


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! LIC ला 22 हजार कोटींची नफा, आयकर विभागाकडून LIC चा परतावा मंजूर