Viral Video : आपले भारतीय सैन्य भारताला शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे काम करते. उष्ण वाळवंटापासून ते बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावतात. अलीकडेच ITBP ने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 55 वर्षीय कमांडंट रतन सिंग सोनल यांनी एका दमात 65 पुशअप केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ITBP च्या या कमांडंटने 17500 फूट उंचीवर उणे 30 डिग्री तापमानात हा पराक्रम केला आहे.


एकाच वेळी केले 65 पुशअप्स
ITBPने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कमांडंट रतन सिंह लडाखच्या बर्फाळ शिखरावर आहेत. ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 17500 फूट आहे आणि तेथील तापमान उणे 30 अंश आहे. एवढ्या उंचीवर आणि कमी तापमानात रतन सिंग एकावेळी 65 पुशअप्स केले, हे खूपच आश्चर्यकारक आहे. कमांडंट रतन सिंह यांचे वय 55 वर्षे आहे. त्याचे हे धाडस पाहून सोशल मीडियावर त्याच्या हिंमतीला सलाम केला आहे.




 


ITBPचे जवान कठोर प्रशिक्षणासाठी ओळखले जातात
ITBP जवान म्हणजेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची स्थापना 1962 मध्ये झाली होती. सीमेव्यतिरिक्त आयटीबीपीचे जवान नक्षलविरोधी कारवायांसह इतर कारवायांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. ITBP हे देशाची आघाडीचे निमलष्करी दल आहे. या दलातील जवान त्यांच्या कठोर प्रशिक्षणासाठी ओळखले जातात.


हे जवान कोणत्याही परिस्थिती आणि आव्हानाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात. वर्षभर हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित फॉरवर्ड पोस्टवर राहून देशाची सेवा करणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे, म्हणून त्यांना 'हिमवीर' म्हणूनही ओळखले जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha