Anant Ambani-Radhika Merchant 2nd Pre-Wedding : मार्च महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण जगभरात एका आलिशान सोहळ्याची चर्चा होती. मुकेश अंबानी (Mukesh Ambano) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका अंबानीचा (Radhika Merchant ) प्री वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. या सोहळ्याला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बिल गेट्स, रिहाना ते बॉलीवूडमधील दिग्गजांची मांदियाळी या सोहळ्याला होता. तीन दिवस जामनगर पाहुण्यांनी अगदी गजबजून गेलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा या दोघांच्या दुसऱ्या प्री वेडिंगच्या चर्चा सुरु आहेत. 


दरम्यान यंदाचं हे प्री वेडिंग भारताबाहेर होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यातचप्रमाणे समुद्राच्या मध्यभागी एका क्रूजवर हे प्री वेडिंग पार पडणार असल्याचंही वृत्तानुसार सांगण्यात आलं आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या सोहळ्याला केवळ 800 लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक भव्य दिव्य सोहळा अनुभवता येणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. 


कधी पार पडणार दुसरं प्री-वेडिंग?


वृत्तानुसार, अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंगचा सोहळा हा 28 ते 30 मे दरम्यान पार पडणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांचे लग्न जुलैमध्ये पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी पुन्हा एकदा त्यांच्या दुसऱ्या प्री वेडिंगची लगबग अंबानी कुटुंबात सुरु असल्याचं चित्र आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी एकूण 800 लोकांना निमंत्रित करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे या सोहळ्याला कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची उत्सुकता सध्या अनेकांना लागून राहिलीये.


कुठे पार पडणार सोहळा?


यंदाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी अंबानी कुंटुबांकडून भारताबाहेरचं लोकेशन निवडण्यात आलं असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. समुद्राच्या मध्यभागी हे लोकेशन निवडण्यात आलं आहे. वृत्तानुसार, हे प्री वेडिंग क्रूझवर होणार आहे. तसेच हे क्रूझ इटलीवरुन निघणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यानंतर हा प्रवास दक्षिण फ्रान्समध्ये संपणार आहे. त्यामुळे क्रूझवर समुद्राच्या मध्यभागी अंबानी आणि मर्चंट कुटुंबियांचा एक भव्य दिव्य सोहळा पार पडणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 


प्री-वेडिंग सोहळ्याचा आलिशान थाट


जामनगरमध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प इत्यादी जगभरातील मोठ्या व्यक्ती या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.  लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये, अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांना चार्टर्ड प्लेन, वॉर्डरोब सेवा, जागतिक दर्जाचे शेफ, पिकअप आणि ड्रॉपसाठी लक्झरी वाहने यांसारख्या अनेक सेवा दिल्या होत्या. 


ही बातमी वाचा : 


Tejshri Pradhan : आईच्या जाण्यानंतर 6 महिन्यांनी तेजश्रीची भावूक पोस्ट, ऑनस्क्रीन आईचे 'प्रेमाचे शब्द', शुभांगी गोखले म्हणाल्या, 'माझ्यासारख्यांना तुझ्याकडे लक्ष...'