एक्स्प्लोर

IRCTC च्या नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच, तिकीट बुकिंग सुपरफास्ट होणार, रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज 

IRCTC New Website:  अखेर आयआरसीटीसीकडून नवी वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. यामुळं रेल्वेची तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी आणि वेगवना होईल.  

IRCTC New Website Launched नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था आधुनिक करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझ्म कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसकडून नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. या नव्या वेबसाईटवर नवीन डिझाईन फीचर्सचा अनुभव घेता येईल याशिवाय सूचना देखील देता येतील.  नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन https://www.irctc.co.in/eticket/ वर उपलब्ध असेल. याशिवाय आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या होमपेजवर बीटा व्हर्जनची लिंक देण्यात आली आहे.  

MNIT च्या विद्यार्थ्यांच्या सूचनेनंतर नवी वेबसाईट लाँच

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, वेबसाईटमधून महत्वाच्या सुधारणा MNIT, जयपूरच्या विद्यार्थ्यांच्या सूचनेनंतर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेबसाईट डिझाईन आणि यूजर एक्सपीरिअन्सला अधिक उत्कृष्ठ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

आयआरसीटीसीची सध्या सुरु असलेली वेबसाईट 2002 मध्ये सुरु झाली होती. त्या वेबसाईटवर प्रतिदिन 14.5 लाख तिकीट बुकिंग होतात.  

नव्या वेबसाईटमध्ये काय सुविधा असणार?

नवी वेबसाईट अधिक सोपी, वेगवान आणि यूजर्स फ्रेंडली करण्यात आली होती. बीटा व्हर्जनमध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहेत. अनावश्यक कॅप्चा, पॉप-अप, फ्लॅशिंग ग्राफिक्स, लक्ष विचलित करणारे एलिमेंटस हटवण्यात आले आहेत.  एकाच स्क्रीनवर सर्व क्लास म्हणजेच श्रेणीतील तिकीटची उपलब्धता दिसून येईल. प्रवाशांची माहिती पहिल्यापासून सेव्ह असेल त्यामुळं दुसऱ्यांदा तिकीट बुक करताना अधिक माहिती भरण्याची आवश्यकता नसेल.

रेल्वे मंत्रालयाकडून बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे, त्याचा उद्देश प्रवाशांकडून सूचना आणि फीडबॅक मिळवणं आहे, असं सांगण्यात आलं आहे. अंतिम व्हर्जन लाँच करताना त्यामध्ये अपडेटेशन केलं जाईल. ज्यामुळं यूजर्सला चांगला अनुभव मिळेल.  

Passenger Reservation Engine लवकरच येणार

याशिवाय भारतीय रेल्वेकडून समांतर पद्धतीनं पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिनचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कारण ही सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्सला संचलित केलं जातं, त्याला देखील लाँच केलं जाईल.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची वेबसाईट आणि नवीन पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिन पूर्णपणे एकीकृत झाल्यानंतर तिकीट बुकिंग अधिक वेगवान, सोपी आणि आधुनिक ऑनलाईन तिकिट बुकिंगचा अनुभव मिळेल. आयआरसीटीसीचं नवं पोर्टल पुढील आठवड्यात उपलब्ध करुन दिलं जाईल. रेल्वेनं प्रवाशांना यूजर्सला नवी वेबसाईट वापरण्याचा आणि शिफारस करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Embed widget