मुंबई : शेअर मार्केटची (Share Market) दुनिया फार वेगळी आहे. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. या क्षेत्रात क्षणात एखादा गुंतवणूकदार भिकेला लागतो तर कधी एखादा गुंतवणूकदार क्षणात कोट्यधीश होतो. सध्या अशाच एका घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे एका पाच महिन्याच्या मुलाला तब्बल 4.2 कोटी रुपये मिळणार आहेत.
नातवाला भेट दिले 240 कोटींचे शेअर्स
कोट्यधीश झालेला हा पाच महिन्यांचा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून इन्फोसिस (Infosys) कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा नातू आहे. त्यांच्या पाच महिन्यांच्या नातवाच्या (Infosys Founder Narayan Murthy's grandson) संपत्तीत एका झटक्यात तब्बल 4.2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस या कंपनीचे 240 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेले समभाग त्यांचा नातू एकाग्र (Ekagra Murthy) याला भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे नारायण मूर्ती यांच्या एकाग्र या पाच महिन्याच्या नातवाची संपत्ती तब्बल 4.2 कोटी रुपयांनी वाढली आहे.
कंपनीने नेमका काय निर्णय घेतला?
इन्फोसिस या कंपनीने दोन प्रकार डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. याच घोषणेमुळे एकाग्र मूर्ती या छोट्या मुलाच्या संपत्तीत 4.2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या निर्णयामुळे पाच महिन्यांचा एकाग्र आणखी श्रीमंत झाला आहे. कंपनीने 31 मार्च रोजी फायनल आणि स्पेशल डिव्हिडंडची शिफारस केली होती. नारायण मूर्ती यांनी त्यांचा नातू एकाग्र याला 240 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे शेअर भेट म्हणून दिल्यानंतर या पाच महिन्यांच्या मुलाला एकूण 15 लाख शेअर्स म्हणजेच कंपनीत 0.04 टक्के हिस्सेदारी मिळाली. कंपनीने जाहीर केलेल्या एकूण 28 रुपयांच्या डिव्हिडंडमुळे एकाग्र मूर्ती यांना आता आणखी 4.2 कोटी रुपये मिळतील.
कंपनीने डिव्हिडंडच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला? (Infosys Dividend Details)
इन्फोसिस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत कंपनीने दोन प्रकारे डिव्हिडंड देण्याचे ठरवले. यातील पहिला डिव्हिडंड हा स्पेशल तर दुसरा डिव्हिडंड हा फायलन डिव्हिडंड आहे.
हेही वाचा :
मंदिरात गेला अन् दान केले तब्बल 5 कोटी, मुकेश अंबानींच्या मुलाच्या दानशूरतेची चर्चा!
काय सांगता! लँण्ड रोव्हरच्या कार स्वस्त होणार? टाटा मोटर्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत