Ajinkya Rahane IPL 2024 : आयपीएलच्या मैदानात आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG vs CSK) यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. पण या सामन्याआधीच चेन्नईचं (CSK) टेन्शन वाढलं आहे. होय.. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya rahane) खराब फॉर्ममुळे चेन्नईच्या ताफ्यात टेन्शनचं वातावरण आहे.. चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) शानदार कामगिरी केली आहे. चेन्नईनं सहा सामन्यात चार विजयाची नोंद केली आहे. पण अजिंक्य रहाणे याला लौकिकास साजेशी कामगरी करता आलेली नाही. अजिंक्य राहणे (Ajinkya rahane)  सपशेल अपयशी ठरलाय. अजिंक्य रहाणेला चेन्नईनं सलामीला पाठण्याचा जुगारही खेळला, पण यामध्येही अपयशच आले. आज लखनौविरोधात (CSK vs LSG) होणाऱ्या सामन्यामध्ये चेन्नईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, अजिंक्य रहाणे अधीच खराब फॉर्ममध्ये आहे, त्यातच त्याला दुखापतही झाली आहे. चेन्नईच्या ताफ्यात आज नव्या भिडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 


अजिंक्य रहाणेनं दिल्ली कॅपिटल्सविरोधात 45 धावांची खेळी केली होती. तर सनरायजर्स हैदराबादविरोधात 35 धावांचं योगदान दिलं होतं. पण या धावा संथ गतीने आल्या होत्या. मुंबई इंडियन्सविरोधात अजिंक्य रहाणे सलामीला उतरला होता. पण त्याला फक्त पाच धावाच करता आल्या. लखनौविरोधातील सामन्याआधी अजिंक्य राहणे दुखापतग्रस्त असल्याचं समजेतय. खराब फॉर्म आणि दुखापत.. यामुळे ऋतुराज गायकवाड अजिंक्य रहाणे याला आराम देऊ शकतो. चेन्नईच्या ताफ्यात आज नव्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. 


यंदाच्या हंगामातील अजिंक्य रहाणेची कामिगिरी - 


आयपीएलच्या 17 व्या हंगामात अजिंक्य रहाणेला हवी तशी कामगिरी करता आली नाही. अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून अद्याप एकही अर्धशतक निघाले नाही. रहाणेच्या बॅटमधून निघालेल्या धावाही संथ गतीने आल्या आहेत. अजिंक्य रहाणेनं सहा सामन्यात फक्त 124 धावा केल्या आहेत. मागील आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे यानं 14 सामन्यात 326 धावा केल्या होत्या. या धावा 200 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या होत्या. पण यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणेची बॅट शांतच असल्याचे दिसतेय. 


चेन्नईपुढे लखनौचं आव्हान - 


आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये लढथ होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि लखनौ संघाचे प्रत्येकी सहा सहा सामने झाले आहेत, दोन्ही संघाने प्रत्येकी तीन तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ संतुलीत आहेत, त्यामुळे सामना रोमांचक होईल. 


आणखी वाचा :


VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला


100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर