मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रि-वेडिंग कार्यक्रमाची (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding) जगभरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता ते एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी देशातील दोन प्रसिद्ध मंदिरांना कोट्यवधींचं दान दिलं आहे.


दोन मंदिरांना पाच कोटींचं दान


मिळालेल्या माहितीनुसार अनंत अंबानी यांनी दोन मंदिरांना तब्बल पाच कोटी रुपयांचं दान दिलं आहे. जगन्नाथ मंदिर आणि आसाममधील कामाख्या देवीचे मंदिर असे या दोन्ही मंदिरांचे नाव आहे. अनंत अंबानी यांनी प्रत्येक मंदिराला तब्बल दोन कोटी 51 लाख रुपयांचे दान दिले आहे. 


14 नव्या मंदिर निर्माणासाठी मदत


राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे नेहमीच वेगवेगळ्या मंदिरांत देवाचे दर्शन घेताना दिसतात. अनंत अंबानी यांनी मंगळवारी (16 एप्रिल) कामाख्या देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी या मंदिराला 2 कोटी 51 लाख रुपयांचे दान दिले. अनंत अंबानी हे रिलायन्स वेंचर्स लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. याच वर्षी अंबानी परिवाराने गुजरातमधील जामनगरच्या 14 नव्या मंदिरांच्या निर्माणासाठी मदत केली होती. 


मार्चमध्ये राधिका-अनंत यांचे प्री-वेडिंग 


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 2022 मध्ये साखरपुडा झाला होता. हा साखरपुडादेखील राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. तर या वर्षाच्या मार्च महिन्यात या दोघांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. जामनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 1 ते 3 मार्च या कालावधित हा सोहळा रंगला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी, दिग्गज उद्योगपतींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे विदेशातील सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 


येत्या 12 जुलै रोजी होणार लग्न 


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे येत्या 12 जुलै रोजी लग्न होणार आहे. हे देशातील सर्वांत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित लग्न आहे. हा लग्नसोहळा अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानी पार पडण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा :


काय सांगता! लँण्ड रोव्हरच्या कार स्वस्त होणार? टाटा मोटर्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत


शेअर बाजार आपटल्याने लोकांचे कोट्यवधी बुडाले, पण टाटाची 'ही' कंपनी देणार तगडे रिटर्न्स, शेअर्स खरेदीचा सल्ला!


लग्न, कर्जफेड ते वैद्यकीय उपचार, PF खात्यातील पैसे नेमके कधी काढता येतात? जाणून घ्या नियम आणि अटी!