Indigo: मोठी बातमी! इंडिगोकडून 500 नवीन एअरबस विमानं खरेदी करण्याची घोषणा
Indigo Airlines: इंडिगो एअरलाइन्सने 500 एअरबसची ऑर्डर दिली आहे. विमान सेवेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याची म्हटले जात आहे.
Indigo Airlines: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली इंडिगो एअरलाइन्सने मोठी घोषणा केली आहे. इंडिगो विमान कंपनी 500 नवीन एअरबस A320 खरेदी करणार आहे. कोणत्याही भारतीय विमान कंपनीकडून एकाच वेळी देण्यात आलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. ही विमाने 2035 पर्यंत टप्प्याटप्प्याने इंडिगोच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
इंडिगो एअरलाइन्सने काय म्हटले?
इंडिगो एअरलाइनने याबद्दल बोलताना सांगितले की, 2030 ते 2035 दरम्यान विमानांची डिलिव्हरी अपेक्षित आहे. "500 विमानांची ही ऑर्डर केवळ इंडिगोची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर एअरबससह कोणत्याही विमान कंपनीने केलेली एक-वेळची सर्वात मोठी खरेदी असल्याचेही इंडिगोने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, या 500 विमानांची इंजिने कालांतराने निवडली जातील; यामध्ये A320 आणि A321 विमानांचा समावेश असेल. एअरबसने व्यावसायिक विमान कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खरेदी असल्याचे सांगितले.
More #A320neo! @flynas just added 30 A320neo Family aircraft to its fleet at #ParisAirShow to support its development plans, leveraging the aircraft's unbeatable economics, longer range capability and spacious cabin. https://t.co/AwX91MQ5ol pic.twitter.com/0ww0VF3W01
— Airbus Newsroom (@AirbusPRESS) June 19, 2023
एअर इंडियाकडून 470 विमानांची ऑर्डर
यापूर्वी एअर इंडियाने फेब्रुवारी महिन्यात 470 विमाने खरेदी करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यापैकी 250 विमाने एअरबसकडून आणि 220 विमाने बोईंगकडून खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन विमान उत्पादक कंपन्यांकडून अतिरिक्त 370 विमाने खरेदी करण्याचाही पर्याय आहे. एअर इंडियाने 17 वर्षांहून अधिक काळात प्रथमच नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीत सरकारकडून घेतली होती.
इंडिगोचे शेअर दर काय?
आज, सोमवारी इंडिगोच्या शेअर दर 0.41 टक्क्यांच्या तेजीसह 2440 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर दरात YTD मध्ये 19.41 टक्क्यांनी वधारला आहे. मागील एका वर्षात हा शेअर 57.48 टक्क्यांनी आणि मागील पाच वर्षात 105.96 टक्क्यांचा परतावा दिला आहे. इंडिगोचा 52 आठवड्यातील नीचांकी शेअर दर 1,513.30 रुपये इतके असून 52 आठवड्यातील उच्चांकी दर हा 2488 रुपये इतका आहे. कंपनीचे बाजार भांडवल 94,073.49 कोटी रुपये इतके आहे.