Indian Stock Market Records : भारतीय शेअर मार्केटमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स  58 हजारांच्या पार पोहचला आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात, सेन्सेक्स 217 अंकांनी उसळी घेत 58,069 वर पोहोचला. तर निफ्टी 66.20 गुणांनी वाढून 17,300 वर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 514 गुणांनी वाढून नव्या उंचीवर पोहोचला होता. तर NSE निफ्टी देखील 157.90 अंकांनी वाढून 17,234.15 च्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला होता.


काल (गुरुवारी) सेन्सेक्सच्या समभागांमध्ये 3.34 टक्क्यांच्या वाढीसह टीसीएसच्या समभागात सर्वाधिक वाढ झाली होती. याशिवाय एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज, नेस्ले इंडिया, कोटक बँक आणि टायटन हे शेअर चर्चेत असतील. 


तर दुसरीकडे महिंद्रा अँड मंहिद्राचे शेअर्समध्ये सर्वाधित 2.29 टक्क्यांची पडझड झाली. कंपनीनं सांगितलं की, जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे ते उत्पादन 25 टक्क्यांनी कमी करणार आहेत. यामुळे कंपनीचे शेअर खाली आले आहेत. घटलेल्या शेअर्समध्ये बजाज ऑटो, बजाज फिनसर्व, बजाज फायनॅन्स, एशियन पेंट्स आणि एल अँड टीचा समावेश आहे. यामध्ये 0.79 टक्क्यांची पडझड झाल्याचं दिसून आलं. अशातच आज रिलायन्स, जस्ट डायल, आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, व्होडाफोन आयडिया, अदाणी ग्रीन, पीएनबी आणि कोल इंडिया या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल दिसत आहे.


दरम्यान, अमेरिकेतही एल अँड पी 500 आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम यामुळे शेअर मार्केटमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :