Stock Market Opening : शुक्रवारी मोठ्या पडझडीनंतर सोमवारी सकाळी किंचित पडझडीसह शेअर मार्केट उघडलं. सेंसेक्स 79 अकांच्या पडझडीसह 57,028 आणि निफ्टी 29 अंकांच्या वाढीसह 17,055 अंकांवर ट्रेड करत आहे. शेअर मार्केट उघडताच हेल्थकेअर, टेलिकॉम आणि फार्मा स्टॉक्स तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. 


SGX निफ्टीकडून मिळाले होते चांगले संकेत


सकाळच्या वेळी, हिरव्या चिन्हात ट्रे़ड करत असलेल्या SGX निफ्टीकडून मिळणाऱ्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. SGX निफ्टी 106 अंकांच्या वाढीसह 17,148 अंकांवर व्यवहार करत आहे.


आशियाई बाजाराचा संमिश्र कल


शुक्रवारच्या तुलनेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आशियाई बाजार माफक प्रमाणात ट्रेड करत आहे. तैवानचा निर्देशांक 9 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर शांघाय 11 अंकांनी घसरला आहे, तर निक्केई 5 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. शुक्रवारीही या बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली होती.


या सेक्टर आणि शेअर्सवर नजर 


शेअर बाजारात आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर साऱ्यांच्या नजरा असतील. रविवारी Airtel Vodafone-Idea नंतर, Reliance Jio ने देखील 1 डिसेंबरपासून मोबाईल प्रीपेड टेरिफ 8 ते 21 टक्के वाढवण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे निकाल शनिवारी आले आहेत, त्यामुळे त्याच्या स्टॉकवरही आज साऱ्यांचं लक्ष असणार आहे. आजही फार्मा-हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तेजीत राहण्याची अपेक्षा, तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 


नोव्हेंबरमध्ये FPI ची खरेदी


शेअर बाजारात जरी पडझड पाहायला मिळत असली, तरी Foreign Portfolio Investors ( FPI ) ने नोव्हेंबर महिन्यात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये 5319 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी करण्यात आली. तर  ऑक्टोबरमध्ये एफपीआयने 12,437 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. 


शुक्रवारी मोठी पडझड 


शुक्रवारचा दिवस भारतीय शेअर बाजारांसाठी  ( Indian Stock Market) ब्लॅक फ्रायडे ठरला. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन समोर आल्यानंतर बाजारात मोठी पडझड दिसून आली होती. सेन्सेक्स 1687 अंकांनी घसरून 57,107 वर तर निफ्टी 510 अंकांनी घसरून 17,026 वर बंद झाला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :