Rakesh Jhunjhunwala loss in Share market :  मागील काही दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठी पडझड झाली. या पडझडीत लाखो सामान्य गुंतवणुकदारांना फटका बसला आहे. शेअर बाजारातील या पडझडीचा फटका बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांनादेखील बसला असल्याचे समोर आले आहे. राकेश झुनझुनवाला यांना एका स्टॉकमधील घसरणीमुळे 753 कोटींचा तोटा झाला आहे. 


या आठवड्यात शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. शुक्रवारी, बाजारावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या भीतीचे सावट दिसून आले. शुक्रवारी बाजारात झालेल्या चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्स 1600 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे 7.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. 


झुनझुनवाला यांना असा झाला तोटा


राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत काही शेअर आहेत. त्यापैकी शुक्रवारी टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 4.37 टक्क्यांनी घसरण झाली होती. या आठवड्यात झुनझुनवाला यांच्या आवडत्या शेअरमध्ये जवळपास सात टक्के घसरण झाली. टायटनच्या शेअरची किंमत 2467 रुपयांवरून 2293 रुपये इतकी झाली. या दरम्यानच्या कालावधीत प्रति शेअर 174 रुपयांची घट झाली.


झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे किती शेअर्स?  
 
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत 4.87 टक्के हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 3.80 टक्के आहेत. तर, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95, 40, 575 शेअर्स म्हणजे जवळपास 1.07 टक्के शेअर्स आहेत.   


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Rakesh Jhunjhunwala शेअर बाजारातील कमावते झाले गमावते! राकेश झुनझुनवाला यांना 753 कोटींचा फटका


स्टेट बँकेला RBIचा दणका; ठोठावला एक कोटींचा दंड


शेअर बाजाराला 'कोविड बाधा'! सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, दोन तासांत 6 लाख कोटींचे नुकसान


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA