Elon Musk Starlink Internet : जगातील अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीकडून भारतात इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेसने भारतीयांकडून इंटरनेट सेवेसाठी सदस्य शुल्क घेण्यासही सुरुवात केली. मात्र, केंद्र सरकारने मस्क यांच्या कंपनीला दणका दिला आहे. मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीकडे परवाना नसल्यामुळे नागरिकांनी कंपनीच्या जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन दूरसंचार विभागाने केले आहे. 


स्टारलिंकची इंटरनेट सेवा ही उपग्रहाआधारीत आहे. कंपनीने भारतातही आगाऊ नोंदणी करण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त होते.  www.starlink.com या संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येत होते. मात्र, केंद्र सरकारने मस्क यांना धक्का दिला आहे. स्टारलिंककडे कोणताही परवाना नसल्यामुळे नागरिकांनी जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन केंद्र सरकारने केल आहे. 


आधी परवाना मग व्यवसाय 


भारतातील इंटरनेट बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मस्क यांच्या कंपनीने कंबर कसली होती. दूरसंचार विभागाने मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला संबंधित प्राधिकरणाकडे आवश्यक ती मंजुरी घेण्याची सूचना केली. स्टारलिंकने आधी परवानगी घ्यावी आणि त्यानंतर सेवा पुरवावी असे दूरसंचार विभागाने म्हटले. 


नियम प्रक्रियेकडे दुर्लक्ष


स्टारलिंक कंपनीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले. भारतात इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांनुसार परवानग्या न घेताच स्टारलिंकने सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी बुकींग सुरू केले असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले. 


भारतात मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट कंपनीची स्पर्धा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत होणार असल्याची चर्चा आहे. कोअर ग्रुपमधील सरळ स्पर्धा भारती एअरटेल ग्रुपच्या OneWeb कंपनीशी आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


टाटा, बिर्ला आणि रिलायन्सला बँकिंग क्षेत्रात 'नो एन्ट्री'; RBI ने मागणी फेटाळली  


कपडे धुणे महागणार; साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA