RBI fined on SBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकला दणका दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रशासकीय नियमांचे पालन न केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने शुक्रवारी दिलेल्या एका माहितीनुसार, 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. 31 मार्च 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान देखरेख मूल्यांकनाबाबत वैधानिक निरीक्षण केले गेले.
आदेशानुसार, जोखीम मूल्यांकन अहवालानुसार, या निरीक्षण अहवालात बँकिंग विनियमन नियमांतील एका नियमांचे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले. स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदार कंपन्यांच्या बाबतीत, कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या तीस टक्क्यांहून अधिक रक्कम तारण ठेवण्यात आली होती. आरबीआयने या प्रकरणात एसबीआयला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. बँकेने दिलेल्या उत्तरानंतर दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सनाही दंड
त्याशिवाय, रिझर्व्ह बँकेने दोन पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सनाही दंड ठोठावला आहे. टाटा कम्युनिकेशन पेमेंट सॉल्यूशन आणि एपनिट टेक्नोलॉजी या दोन कंपन्या आहेत. टाटा कम्युनिकेशन पेमेंट सॉल्यूशनवर व्हाइट लेबल एटीएम लावण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला. तर, एपनिट टेक्नोलॉजीने खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल आणि निव्वळ मूल्याची आवश्यकता राखण्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Elon Musk : मस्क यांच्या 'या' कंपनीपासून दूर राहा, जाणून घ्या केंद्र सरकारने असे का म्हटले?
टाटा, बिर्ला आणि रिलायन्सला बँकिंग क्षेत्रात 'नो एन्ट्री'; RBI ने मागणी फेटाळली
कपडे धुणे महागणार; साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha