एक्स्प्लोर

Indian Share Market : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! भारत इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर

World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Indian Market 5th Place in World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये (World's Top Equity Market) पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं. पण आता अदानी शेअर्सची बाजारातील परिस्थिती सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.

भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर

भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) इक्विटी बाजारांमध्ये (Equity Market) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय बाजार भांडवल मूल्य (India’s Market Capitalization) शुक्रवारी 3.15 ट्रिलियन डॉलर इतके होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बाजाराचे भांडवल मूल्यामध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताच्या मागे फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे. यानंतर ब्रिटन बाजार भांडवल मूल्य  सातव्या स्थानावर आहे. 

मात्र, एकूण भांडवल मूल्य 6 टक्क्यांनी कमीच

दरम्यान, अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीनंतरही पुन्हा एकदा अदानी समुहाने बाजारात घोडदौड सुरु केल्याने भारत पाचव्या स्थानावर आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारात घसरण झाली होती, तरी याचा जागतिक बाजारातील भारताच्या इक्विटीमध्ये विशेष परिणाम झालेला दिसत नाही. मात्र 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्यापेक्षा आताचं बाजार मूल्यापेक्षा सहा टक्क्यांनी कमी आहे.

अदानी समुहाच्या शेअर्सच्या विक्रीचा परिणाम

गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. पण, अदानी समुहाच्या प्रयत्नामुळे अदानी कंपन्यांना बाजारात पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. याचा भारतीय शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. 24 जानेवारीपासून अदानी समुहाच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली. सध्याचं भारतीय बाजार भांडवल मूल्यापेक्षा 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्याहून अद्यापही सहा टक्क्यांनी कमी आहे. मात्र, आपण जागतिक इक्विटी बाजारात पाचव्या स्थानावर कायम आहोत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारातील व्यवहार वाढवण्यासाठी दक्षिण आशियाई देशांचा मोठा वाटा आहे. यासाठी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या बाजाराचा फायदा झाला आहे. मागील दोन वर्षातील दक्षिण आशियाई देशांची भारतीय बाजारात गुंतवणूक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत भारत हा जगातील टॉप-5 अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर भारत टॉप-5 इक्विटी बाजारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर भारतीय बाजारातील उलाढालीमुळे फ्रान्स पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. पण फ्रान्सचा हा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही. कारण आता पुन्हा एकदा भारताने इक्विटी बाजारात आपलं पाचवं स्थान कायम मिळवलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रियाMaharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवारMaharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
Embed widget