एक्स्प्लोर

Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

Tatkal Ticket Booking Rules : भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमातील बदल 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल्याप्रमाणे तात्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. या बदलांची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार 1 जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तर, 15 जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येईल. 

तात्कळ तिकिट बुकिंग करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रवाशांकडून सातत्यानं आवाज उठवला जात होता. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवे बदल जाहीर केले आहेत. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचं जाहीर केलं. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा  गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.

नवे बदल पुढील प्रमाणे 

1. ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण

दिनांक 1 जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.याचसोबत 15 जुलै 2025 पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी  आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल. 

2. पीआरएस काउंटरवर  आणि मध्यस्थांच्या माध्यमातून तात्काळ तिकीट आरक्षणासाठी प्रणाली आधारित ओटीपी प्रमाणीकरण: 

संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तात्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना  वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल.ही तरतूद देखील 15 जुलै 2025 पासून लागू होईल.

3. अधिकृत  एजंटांसाठी आरक्षण वेळेचे निर्बंध: 

तात्काळ तिकिट बुकिंगच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण वेळेत होणाऱ्या बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटाना प्रारंभिक दिवस तात्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीतील तिकीट बुकिंगसाठी, हे निर्बंध सकाळी 10:00 ते 10:30 पर्यंत आणि बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी, सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत लागू राहतील.

तात्काळ आरक्षणामध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि योजनेचे फायदे खऱ्या अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. 

सीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालय सर्व प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केलं आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी यूजर प्रोफाइलशी आधार जोडणी पूर्ण केल्याची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget