Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी आहे. जपानी (japan) ब्रोकरेज कंपनी नोमुराने (Nomura) चालू आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) साठी भारताचा विकासदराचा अंदाज 5.9 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची अधिकृत आकडेवारी आल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.
ब्रोकरेज कंपन्यांच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विकास दर 5.6 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी सार्वजनिक भांडवली भांडवल मंदावणे, ग्रामीण मागणीत घट आणि खासगी भांडवल बाजारातील घट, जागतिक मंदी यामुळे 2024-25 मध्ये विकासदरात घसरण होऊ शकते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान, चालू आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) च्या दुसर्या तिमाहीत, देशाची अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने वाढली आहे. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत GDP 6.3 टक्के होता. बहुतेक विश्लेषकांना अपेक्षा होती की, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सुमारे 6.8 टक्के असणार आहे.
S&P ने GDP वाढीचा अंदाज वाढवला
रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2024 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मजबूत देशांतर्गत घटकांमुळे रेटिंग एजन्सीने वाढीचा अंदाज वाढवला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्यानं वाढ
सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात म्हणजे 2047 साली आपला भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणू पुढे येईल. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर असणार आहे. अलीकडेच आपण 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे. विकसित देशाचा दर्जा मिळविण्यासाठी लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर केली जाणार आहे. त्यात भारत कोणत्या मार्गांवर हे लक्ष्य साध्य करेल याचा उल्लेख आहे.
भारताचा विकास योग्य दिशेने सुरू
NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा विकास योग्य दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये Vision India@2047 डॉक्युमेंट आणणार आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारत कोणत्या मार्गांवर, सुधारणा आणि धोरणांच्या आधारे विकसित देश बनणार आहे, याचा त्यात उल्लेख असेल असे सुब्रमण्यम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: