Indian Economy : आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 2022-23 साठी भारताचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. IMF ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी 8.2 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक घटकांचा प्रभाव आणि कठोर आर्थिक धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास दर कमी राहू शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे. याबरोबरच चलनवाढ नियंत्रित करणे ही देशाच्या धोरणकर्त्यांची प्राथमिकता आहे, त्यामुळे चलनविषयक धोरणात कठोर निर्णय घेतले जात आहेत, असे आयएमएफने म्हटले आहे.
आयएमएफने म्हटले आहे की, 2021 मध्ये जागतिक सुधारणा पाहिल्यानंतर 2022 मध्ये जगभरातील आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होत आहे. चीनच्या आर्थिक हालचाली मंदावल्याचा तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम झाल्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर 0.8 टक्के कमी करून तो 8.2 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला आहे. आर्थिक वाढीचा अंदाज कमी करून देखील 2022-23 आणि 2023-24 मध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.
2023 मध्ये भारताचा अंदाजित विकास दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक विकास दरही घटला असून चालू वर्षात 3.3 टक्के आर्थिक विकासदर राहण्याचा अंदाज आर्थिक नाणेनिधीकडून वर्तवण्यात आला आहे. तर 2023 मध्ये 2.9 टक्के जीडीपीचा राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे अडचणीत वाढ
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे अनेक रेटिंग एजन्सींनी पुढील दोन वर्षांसाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे, जो रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलासह वस्तू आणि खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याकडे लक्ष वेधत आहे. जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.1 टक्के राहिला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. शिवाय सरकारने देखील अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकेल, असे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या