Reserve Bank of India : बँकामध्ये पडून असलेल्या बेवारस पैशांबाबत (unclaimed deposits) भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने (Reserve Bank of India ) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या बेवारस पैशांचा वापर ठेवीदारांच्या जागृकतेसाठी करण्याचा निर्णय आरसीबीने घेतला आहे. बचत खाते अथवा चालू खात्यांमधील रक्कम दहा वर्षांपासून वापरण्यात आलेली नाही. अथवा दहा वर्षांच्या आतमध्ये या मुदत ठेवींचा दावा केला जात नाही. अशा रक्कमेला बँकमध्ये पडून असलेली बेवारस रक्कम (unclaimed deposits) म्हटलं जाईल. या पैशांचा वापर आता ठेवीदारांच्या शिक्षण आणि जागृकतेसाठी (Depositor Education and Awareness” (DEA))  वापरण्यात येणार आहे. 


ठेवीदार आपल्या जमा राशींवर दावा करु शकतात. बँकेत जमा असलेले पैसे व्याजासोबत (जे असेल ते) बँकाकडे असतात. बँकाकडून वारंवार याबाबत माहिती दिली जाते. तरिही ठेवीदारांकडून याबाबत प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या पैशांची संख्या वाढत जाते. याबाबत आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  
 
बँकामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत पडून असलेल्या बेवारस पैशांबाबात आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बचत अथवा चालू खाते बंद न केल्यामुळे बेवारस पैशांची संख्या वाढत जाते. बचत अथवा चालू खात्याचा वापर न केल्यामुळे ठरावीक कालावधीनंतर खाते बँकेकडून बंद करण्यात येते. त्यानंतर खातेदारांना त्याबाबत वारंवार सांगण्यात येते. त्यानंतरही खातेदरांकाडून प्रतिसाद येत नाही. अशा दहा वर्षांपर्यंतच्या खात्यातील पैशांना बेवारस म्हटले जाते. या पैशांबाबात आरसीबीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मृत खातेदारांची प्रकरणेही आहेत. ज्यामध्ये वारसदार सिद्ध न करु शकलेली अनेक खाती आहेत. या खात्यांमधील पैशांनाही बेवारस म्हटले जाते.