Koffee With Karan 7 : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता चौथ्या भागात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) दिसणार आहेत. 


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या चौथ्या एपिसोडचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मजेशीर उत्तर देताना दिसत आहेत. विजय आणि अनन्याची मजेशीर उत्तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. विजय आणि अनन्या 'कॉफी विथ करण'च्या मंचावर अनेक खुलासे करणार आहेत. आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींची माहिती ते 'कॉफी विथ करण'च्या माध्यमातून चाहत्यांना देणार आहेत. 


'कॉफी विथ करण'च्या प्रोमोमध्ये करण विजयला एक व्हिडीओ दाखवत विचारतो, तुला चीज आवडतं? यावर विजय म्हणतो, चर्चा वेगळ्या दिशेने चालली आहे. मला आता भीती वाटत आहे. तर दुसरीकडे करण अनन्याला तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्यासंदर्भात विचारतो तेव्हा ती यासंदर्भात बोलण्यास नकार देते. 






'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, रणवीर सिंह, सारा अली खान, जान्हवी कपूर, अक्षय कुमार, सामंथा रुथ प्रभू यांनी सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पहिले तीन भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता आगामी भागांची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. 


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा प्रीमियर 7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर झाला. प्रेक्षकांना आता घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण 7'चा असाही विक्रम; पहिल्याच भागाला मिळाले सर्वाधिक व्ह्यूज


Koffee With Karan 7 : '... म्हणून मी ट्विंकलच्या पाया पडतो'; कॉफी विथ करणमध्ये अक्षयनं केला गौप्यस्फोट