GDP Data for 1st Quarter 2022-23: कोरोना संकटाच्या (Covi-19 Pandemic)) दोन वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) रुळावर येऊ लागली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (1st Quarter) एप्रिल ते जून दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था 13.5 टक्के दराने वाढली आहे. तर 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 20.1 टक्के जीडीपी होता. तसेच चौथ्या तिमाहीत (4th Quarter) देशाचा आर्थिक विकास दर जानेवारी ते मार्च दरम्यान 4.1 टक्के होता. 2021-22 मध देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे जिडीपी GDP वाढीचा दर वाढला आहे. या तिमाहीत गुंतवणूक विक्रीत वाढ पाहायला मिळाली आहे.
केंद्राच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीला कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. या तिमाहीत रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर जागतिक कारणांमुळे वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. असे असूनही आर्थिक विकास दर वाढलेला दिसत आहे.
एनएसओने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राचा विकास दर 4.8 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राचा विकास दर 49 टक्के होता. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 4.5 टक्क्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा विकास दर 2.2 टक्के राहिला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दर 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 71.3 टक्क्यांच्या तुलनेत 16.8 टक्के आहे. त्याचप्रमाणे व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि ब्रॉडकास्टिंग संबधित सेवांचा वाढीचा दर 25.7 टक्के आहे, जो 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 34.3 टक्के होता. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2.3 टक्क्यांच्या तुलनेत 9.2 टक्क्यांनी वाढल्या.
याबाबत बोलताना नाइट फ्रँक इंडियाचे रिसर्च डायरेक्टर विवेक राठी म्हणाले की, परिस्थिती अनुकूल असल्याने पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीने FY23 मध्ये 13.5% चा दुहेरी आकडा गाठला आहे. असं असलं तरी महागाईच्या उच्च पातळीमुळे अर्थव्यवस्थेतील वास्तविक जीडीपी मंदावली आहे. FY23 च्या पहिल्या तिमाहीत ग्राहक महागाई सरासरी 7.3% होती. जागतिक वस्तूंच्या वाढत्या किमती तसेच रुपयाचे तीव्र अवमूल्यन यामुळे आयात महागाई वाढली आहे. महागाई आणि वाढलेल्या आयात खर्चाचा परिणाम वैयक्तिक आणि सरकारी दोन्ही खर्चाच्या तिमाहीवर दिसून येतो. जो मार्च 2022 पासून 2.4% आणि 10.4% ने कमी झाला आहे. येत्या काही महिन्यांत भारताच्या अर्थव्यवस्थेला मुख्यत: विस्तारीकरणामुळे उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Reliance : मुकेश अंबांनी यांचे वारसदार ठरले, 18 लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन तिघांत होणार
मुंबईत ऑगस्ट महिन्यात घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांची वाढ, तब्बल आठ हजार घरांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या महसुलात 74 टक्क्यांची वाढ