एक्स्प्लोर

निर्यातीत भारतानं केला नवा विक्रम, दर मिनिटाला 15 कोटी रुपयांची निर्यात, सरकारकडून आकडेवारी जाहीर

शेअर बाजार आणि रुपयामध्ये तेजी असतानाच, निर्यातीच्या आघाडीवरही चांगली बातमी समोर येत आहे. 2026 या आर्थिक वर्षात भारताने निर्यातीत लक्षणीय झेप घेतली आहे.

Indias Exports News : शेअर बाजार आणि रुपयामध्ये तेजी असतानाच, निर्यातीच्या आघाडीवरही चांगली बातमी समोर येत आहे. 2026 या आर्थिक वर्षात भारताने निर्यातीत (Indias Exports) लक्षणीय झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षात भारताने प्रत्येक मिनिटाला 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. सरकारने आज निर्यात आणि आयातीची आकडेवारी जाहीर केली, ज्यातून विविध प्रकारची माहिती समोर आली आहे. सरकारने नेमकी कोणत्या प्रकारची आकडेवारी जाहीर केली आहे, याबाबत माहिती पाहुयात.

निर्यातीने विक्रम नोंदवला

वाणिज्य मंत्रालयाच्या सुधारित आकडेवारीनुसार, जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, देशाची वस्तू आणि सेवांची निर्यात 2024-25  मधील 825.26अब्ज डॉलर्सवरून 4.6 टक्क्यांनी वाढून 2025-26  मध्ये 863.11 अब्ज डॉलर्स किंवा 81.42 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. याचा अर्थ, गेल्या आर्थिक वर्षात सरकारने दररोज 22325 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू जगाला निर्यात केल्या. दर 24 तासांनी देशाने 930 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. प्रत्येक मिनिटाला सरकारने इतर देशांना 155 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात वस्तूंची निर्यात 2024-25  मधील 437.70 अब्ज डॉलर्सवरून 0.93 टक्क्यांनी वाढून 441.78 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

सेवा निर्यातीत सर्वाधिक वाढ 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  जागतिक अनिश्चितता आणि वस्तूंच्या व्यापारातील आव्हाने असूनही, भारताच्या वस्तूंच्या निर्यातीने आपली वाढती गती कायम ठेवली आहे. एकूण निर्यात बास्केटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सेवा निर्यातीने सर्वोत्तम कामगिरी केली, जी 2024-25 मधील 387.55 अब्ज डॉलरच्या तुलनेत 8.71 टक्के वाढ नोंदवत 2025-26  मध्ये 421.32 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. ही जलद वाढ आयटी, व्यवसाय उपाययोजना आणि व्यावसायिक कौशल्य यांसारख्या सेवांसाठी वाढती जागतिक मागणी अधोरेखित करते आणि सेवा क्षेत्रात देशाची ताकद आणखी मजबूत करते.

एकूण निर्यातीमध्ये सेवांच्या निर्यातीने महत्त्वपूर्ण योगदान

जागतिक अनिश्चितता आणि वस्तूंच्या व्यापारातील आव्हाने असूनही, भारताच्या वस्तू निर्यातीने आपली वाढीची गती कायम राखली असून, एकूण निर्यातीमध्ये सेवांच्या निर्यातीने महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही आकडेवारी जाहीर करताना सांगितले. सेवा निर्यातीतील मोठी वाढ माहिती-तंत्रज्ञान (आयटी), वाणिज्य उपाययोजना आणि व्यावसायिक कौशल्ये यांसारख्या सेवांना असलेली जागतिक मागणी वाढत असल्याचे अधोरेखित करते, असेही त्या अधिकाऱ्याने पुढे नमूद केले.

महत्वाच्या बातम्या:

JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
Share Market : ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget