Chinese Phones Ban in India : सीमेवरील भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. असं असलं तरी भारतीय बाजारपेठेत चीनचा मोठा वाटा आहे. आता भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. भारत चीनी मोबाईलवर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. भारताकडून चीनी मोबाईलवर बंदी आणण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. असं झाल्यास चीन आणि चीनी कंपन्यांना मोठा धक्का बसणार आहे. भारत 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चीनी मोबाईलवर बंदी आणण्याच्या तयारी सुरु असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. भारतात जून 2022 पर्यंतच्या तिमाहीमध्ये एकूण मोबाईल फोन विक्रीमध्ये 12000 हून कमी किमतीच्या मोबाईलची विक्रीचा वाटा एक तृतीयांश होता. यामध्ये चीनी मोबाईलचे प्रमाण 80 टक्के आहे.


भारत चीनी मोबाईलवर बंदी आणणार?


एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारत चीनी मोबाईलवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. भारत 12 हजारांहून कमी किमतीच्या मोबाईल फोनवर बंदी आणू शकतो, असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. भारताने चीनी कंपन्यांवर बंदी आणल्यास चीनसह शाओमी (Xiaomi) आणि ओप्पो (Oppo) आणि विवो (Vivo) यासारख्या कंपन्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, याचा अ‍ॅपल (Apple) किंवा सॅमसंग (Samsung) या कंपन्यांवर परिणाम होणार नाही. कोरोनाकाळात चीन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक केली आहे. त्याउलट कोरोनाकाळात चीनी बाजारपेठेत मंदीचं वातावरण पाहायला मिळालं आहे. 


भारतीय कंपन्यांचा वाटा कमी
भारत सरकारने यापूर्वीच देशातील शाओमी (Xiaomi) आणि ओप्पो (Oppo) आणि विवो (Vivo) सारख्या चिनी कंपन्यांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप लावले आहेत. भारतात मोबाईल विक्रीमध्ये चीनी कंपन्यांचा वाटा अधिक आहे. तर लावा आणि मायक्रोमॅक्स यांसारख्या देशी कंपन्या मोबाईल उद्योगात मागे आहेत. मोबाईल उद्योगात भारतीय कंपन्यांचा वाटा 50 टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे भारतीय मोबाईल कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांना जागतिक बाजारात समाविष्ट करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून भारत आगामी काळीत चीनी कंपन्यांच्या मोबाईलवर बंदी आणण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या