नवी दिल्ली: तुम्हालाही स्वस्तात परदेशात फिरायचा आहे, पैसे नाहीत. तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये परदेशात प्रवास करु शकणार आहात. हो आणि हे खरं आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय विमान कंपनी व्हिएतजेट यांनी नुकतीच एक ऑफर दिली आहे. याअंतर्गत तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये विमानाने प्रवास करू शकता. या ऑफर अंतर्गत तुम्ही भारत आणि व्हिएतनाम दरम्यान फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. 


तुमचा यावर विश्वास बसणार नाही.परंतु मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर लागू आहे आणि याचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता. बातमी सविस्तर वाचा आणि जाणून घ्या की ही ऑफर आहे तरी काय.


4 ते 26 ऑगस्ट दरम्यान बुकिंग करावे लागेल


व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांवर थेट उड्डाणे चालवली जाणार आहेत. कंपनीने 9 रुपयांच्या हवाई तिकिटांची ऑफर आणली आहे, ज्याचे बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ही ऑफर 26 ऑगस्टपर्यंत वैध असेल. तुम्ही 4 ते 26 ऑगस्ट दरम्यान बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी या ऑफरचा लाभ घेऊ शकता.


कंपनी 30,000 प्रमोशनल तिकिटे देत आहे
व्हिएतजेट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशनल तिकिटे देत आहे. प्रमोशनल तिकिटांच्या किमती प्रत्येकी 9 रुपयांपासून सुरू होत आहेत. याच ऑफर अंतर्गत, 15 ऑगस्ट 2022  ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी तिकिटे बुक करावी लागतील. ऑफरनुसार, तुम्ही प्रमोशनल तिकिटांसाठी 26 ऑगस्टपर्यंतच बुक करू शकता.


त्यामुळे तुमचे परदेशातला एखादा देश फिरायचं स्वप्न तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन पूर्ण करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या: