Book Uber Ride with Whatsapp : तुम्ही उबेर (Uber) वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. याआधी तुम्ही उबेर अ‍ॅपवरून टॅक्स बुक केली असेल, पण आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरूनही (Whatsapp) उबेर टॅक्सी बुक करता येणार आहे. उबेर कंपनीनं (Uber Company) व्हॉट्सअ‍ॅप टू राइट (W2R) फिचर लाँच केला आहे. यामुळे आता उबेर टॅक्सी बुक करणं सोपं झालं आहे. सध्या उबेर कंपनीनं व्हॉट्सअ‍ॅप टू राइट (W2R) ही सेवा फक्त दिल्लीमध्ये सुरु केली आहे. आगामी काळात ही सेवा देशभरात पोहोचेल.


व्हॉट्सअ‍ॅपवरून बुकींग कशी कराल?


आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून सहज उबेर बुक करु शकता. उबेर कॅब बुक करण्यासाठी तुम्हाला आता Uber अ‍ॅप डाउनलोड करण्याचीही गरज भासणार नाही. Whatsapp वरच चॅट करून तुम्ही राइड बुक करू शकता. कॅब बुक करण्यासाठी एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामध्ये तुम्ही हिंदीत चॅट करून कॅब बुक करू शकता. WA2R फीचर म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप टू राइडचा वापर वाढणार असल्याचे उबरचे म्हणणे आहे. 


फीचरमध्ये हिंदी भाषा उपलब्ध असेल


इंग्रजीत बुकिंग करताना अनेकांना त्रास होतो. त्यामुळे लोक कॅब बुक करण्याच्या फंदात पडत नाहीत. कंपनीने हिंदी लोकांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. याद्वारे वापरकर्ते सहजपणे कॅब बुक करू शकतील. याचा फायदा कंपनीला होईल. हिंदीच्या वापरामुळे उबर कंपनीचा राइड वापर वाढू शकतो.


या सोप्या पद्धतीनं उबेर बुक करा.



  • Uber कंपनीकडून युजर्सना कॅब बुक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

  • Uber च्या फोन नंबरवर मेसेज पाठवावा लागेल.

  • दुसरा पर्याय म्हणजे QR कोड स्कॅन करणे आणि राइड बुक करणे.

  • उबेर बुक करण्याचा तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून हा नंबर - 72920 00002 मेसेज करा.

  • मेसेजमध्ये Hi किंवा तुमचं नाव लिहून पाठवा.

  • यानंतर, तुमचा नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी मोबाइलवर OTP पाठवला जाईल.

  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला कुठे जायचे आहे याची माहिती भरावी लागेल.

  • तुम्हाला कोणत्या प्रकारची कार बुक करायची आहे हे विचारलं जाईल, त्यानंतर तुम्हाला पेमेंटबद्दल सांगितले जाईल. यानंतर तुमची राइड बुक केली जाईल.