Coal Production :  जानेवारी 2024 मध्ये एकूण कोळसा उत्पादनात (Coal production) लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबतची माहिती कोळसा मंत्रालयानं (Ministry of Coal) दिली आहे. कोळशाचे उत्पादन हे 99.73 दशलक्ष टन मेट्रिक टन वर  पोहोचले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत कोळसा उत्पादन 90.42 एमटी इतके होते. म्हणजेच सध्या यामध्ये 10.30 टक्के वृद्धी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोळसा निर्यातीत देखील वाढ झाल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. 


कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये 99.73 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळं कोळशा निर्यातीत देखील 6.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कोळसा निर्यातीचा आकडा हा 87.37 मेट्रीक टनवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 मध्ये कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 78.41 एमटी वर पोहोचले आहे. जानेवारी 2023 मधील 71.88 एमटी च्या तुलनेत यात 9.09 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या एकत्रित कोळसा उत्पादनाने (जानेवारी 2024 पर्यंत) 784.11 एमटी (तात्पुरती) इतकी लक्षणीय झेप घेतली आहे. आर्थिक वर्ष 22-23 मधील याच कालावधीच्या 698.99 एमटी उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये 12.18 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.


कोळशाच्या निर्यातीतही वाढ


जानेवारी 2024 मध्ये कोळशाच्या 87.37 99 मेट्रीक टन इतकी कोळशाची निर्यात झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये 82.02 मेट्रीक टन कोळसा निर्यात झाला होता. कोळसा निर्यातीच्या तुलनेत 6.52 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) जानेवारी 2024 मध्ये 67.56 एमटी कोळसा निर्यात करुन उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. जानेवारी 2023 मध्ये हा आकडा 64.45 मेट्रीक टन इतका होता, म्हणजेच यामध्ये 4.83 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.


औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील कोळशाच्या साठ्यात वाढ


आर्थिक वर्ष 23-24 मधील (जानेवारी 2024 पर्यंत) एकत्रित कोळसा निर्यातीचा आकडा 797.66 मेट्रीक टन इतका (तात्पुरता) होता. आर्थिक वर्ष 22-23 मधील याच कालावधीत 719.78 मेट्रीक टन कोळसा निर्यात झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोळसा निर्यातीत 10.82 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. दरम्यान, 31. जानेवारी 2024 पर्यंत, कोळसा कंपन्यांकडे असलेल्या कोळसा साठ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ 47.85 टक्के इतकी आहे. तसेच औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील (TPP) कोळशाच्या साठ्यामध्ये, विशेषत: डीसीबी म्हणून ओळखल्या गेलेल्या ठिकाणी,15.26 टक्क्यांची वार्षिक वाढी झाली आहे. त्या ठिकामी 36.16 मेट्रीक टन इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.


महत्वाच्या बातम्या:


कोळसा विकून 'ही' कंपनी बनली श्रीमंत, फक्त तीन महिन्यांत कमावले 6 हजार 800 कोटी