NCP Symbol : अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले असून, यावरून राजकीय वातावरण तापले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, त्यांना लोकशाहीने जागा दाखवली आहे, असे म्हणत फडणवीसांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. 


याबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, "हा अपेक्षित निर्णय आहे. कारण मागील अनेक वर्षात अशा प्रकरणात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात निवडणूक आयोगाची सातत्याने हीच भूमीका राहिली आहे. बहुमताने जो निर्णय घेतला जातो, तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो. पक्षाचे संविधान आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टीचा उहापोह या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचा मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल, असेही फडणवीस म्हणाले. 


लोकशाहीने त्यांची त्यांना जागा दाखवलेली 


पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, "बहुमताला महत्व आहेच, केवळ बहुमताचा आधारावर निर्णय झाला नाही. तर, सर्व बाबीचा विचार झाला आहे. वेळोवेळी पार्टीच संविधान कसं होतं, निवडणुका झाल्या की नाही, आता पक्ष कोणाचा आहे, याचा विचार झाला आहे. 2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे. या निर्णयाला मी कोणाला चपराक वगैरे म्हणत नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत. 


अजित पवारांचे अभिनंदन...


दरम्यान याबाबत ट्वीट करत फडणवीस यांनी अजित पवारांचे अभिनंदन देखील केले आहेत. “आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


NCP Crisis :निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट, आता नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता