Hyundai - Tata Power Partnership: देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेत, ह्युंडाई मोटर्स इंडिया आणि टाटा पॉवर या दोन दिग्गज कंपन्यांनी हातमिळवणी करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन दिग्गज कंपन्यांनी जलद चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भागीदारी द्वारे, 29 शहरांमध्ये कंपनीच्या 34 ईव्ही डीलरशिप वर 60kw DC चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.


Hyundai आणि Tata Power EZ चार्ज मोबाईल अॅपद्वारे ते सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या गरजा पूर्ण करतील. या सुविधेद्वारे, ग्राहक चार्जिंग स्टेशन्स, चार्जिंग स्टेशनसाठी प्री-बुक स्लॉट्सवर नेव्हिगेट करू शकतात आणि ऑनलाइन पेमेंट सहज करू शकतात. ही डीलरशिप सध्याचे AC 7.2kW चार्जर देत राहतील. Hyundai आणि Tata Power यांच्यातील या करारामुळे ग्राहकांच्या चार्जिंगच्या समस्या दूर होणार आहेत. Hyundai EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे IONIQ 5 आणि Kona अपडेट लाँच करण्याची तयारी करत आहे.


भागीदारीबद्दल भाष्य करताना, “कंपनीला भारताची ईव्ही इकोसिस्टम सुलभ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक चालवण्यासाठी टाटा पॉवरसोबतच्या भागीदारीमुळे आनंद होत आहे. कार्बन न्यूट्रॅलिटीचे भारताचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा धोरणात्मक भागीदारी आवश्यक असल्याचं  Hyundai Motor India Limited चे MD आणि CEO, उन्सु किम म्हणाले, “आमची Hyundai Motor India सोबतची भागीदारी भारत सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजनेच्या अनुषंगाने आहे आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांचे नेतृत्व करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंग स्पेसमधील कौशल्य, सर्वसमावेशक चार्जिंग सोल्यूशन्स आणि ह्युंदाई वाहनांच्या देशव्यापी मालकीमुळे शाश्वत मोबिलिटी पायाभूत सुविधा विकसित करण्यात, वेगवान ईव्हीचा अवलंब करण्यास मदत होईल.”


इतर महत्वाच्या बातम्या: 


LIC News : लिस्टिंगच्या वेळी LIC IPO गुंतवणुकदारांना का झालं नुकसान? सरकारने म्हटले की....
Share Market : शेअर बाजारात अस्थिरता, Sensex सकाळी वधारला.., दुपारी घसरला