मुंबई: शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली असून कालच्या तेजीला आज लगाम लागल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 109 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 19 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,208 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.12 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,240 वर पोहोचला आहे.
आज 1865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1409 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 108 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
शेअर बाजारात आज उर्जा, एफएसीजी या क्षेत्रामध्ये खरेदी तर रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, Shree Cements, UltraTech Cement, Cipla आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Power Grid Corporation, BPCL, Apollo Hospitals, Tata Motors आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- TATA Cons. Prod- 2.73 टक्के
- Shree Cements- 2.11 टक्के
- HUL- 2.07 टक्के
- UltraTechCement- 2.06 टक्के
- Cipla- 2.04 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Power Grid Corp- 4.50 टक्के
- BPCL- 3.08 टक्के
- Tech Mahindra- 2.18 टक्के
- Tata Motors- 2.12 टक्के
- Apollo Hospital- 2.05 टक्के
सुरुवातीला वधारला, शेवटी घसरला
शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 58.90 अंकाची तेजी दिसून आली होती. निफ्टी निर्देशांक 16318 अंकावर तर सेन्सेक्समध्ये 236 अंकांची तेजी दिसून आली होती. नंतर मात्र त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.