मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ आणला होता. हा आयपीओ तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा नवा आयपीओ येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ असणार आहे. सर्वांत मोठा आयपीओ आणणाऱ्या या कंपनीचे नाव ह्युंदाई मोटार इंडिया असे आहे. ही कंपनी ह्युंदाई मोटर्स कंपनीची उपकंपनी आहे.
लवकरच कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार
ही कंपनी भारतात गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे. ही कंपनी देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील मारुती सुझुकीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कार कंपी आहे. आता ह्युंदाई मोटार इंडिया ही कंपनी लकरच भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहे.
तीन अब्ज डॉलर्सचा आयपीओ
ह्यूंदाई मोटर्स कंपनीने या आयपीओची जबाबदारी कोटक महिंद्रा क्रपिटल आणि मॉर्गन स्टोनली यांच्यावर सोपवली आहे. या दोन्ही बँका ह्यूंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी सूचिबद्ध करताना सल्लागाराची भूमिका बजावतील. मनी कंट्रोल या व्यापारविषकय घडामोडींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार कंपनीचे मूल्य किती आहे, हे ठरवल्यानंतर आयपीओ किती रुपयांचा असणार आहे, हे ठरवले जाणार आहे.
24 ते 25 हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचे मूल्य किती आहे तसेच कंपनी किती हिस्सेदारी विकणार आहे, यावरूनच हा आयपीओ किती रुपयांचा असेल हे ठरवले जाईल. याच आधारावर शेअरची किंमत ठरवली जाईल. मात्र ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2.5 ते 3 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याची शक्यता आहे. या पैशांचे रुपयांत मूल्यांकन करायचे झाल्यास हा आकडा 24 ते 25 हजार कोटी रुपयांच्या आसपास असू शकतो.
जुलै महिन्यापर्यंत चित्र स्पष्ट होणार
या आयपीओचा ड्राफ्ट जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सेबीला पाठवावा असे टार्गेट कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टेनली या दोन्ही बँकिंग कंपन्यांना देण्यात आलेले आहे. कोणत्याही कंपनीला आपला आयपीओ आणण्यासाठी अगोदर भांडवली बाजार नियामक सेबीकडे एक ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) पाठवावे लागते. या डीआरएचपीमध्ये कंपनीच्या आयपीओची संपूर्ण माहिती दिलेली असते. या डीआरएचपीचा अभ्यास करूनच नंतर सेबी संबंधित कंपनीला आयपीओ आणण्याची परवानगी देते. ह्युंदाई इंडियाच्या आयपीओबाबत अनेक तर्क लावले जात आहे. या आयपीओचे एकूण मूल्य हे 20 ते 30 अब्ज डॉलर्स असू शकते, असे म्हटले जात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'हे' सहा शेअर्स घ्या अन् मिळवा 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स, चांगले पैसे कमवण्याची संधी!