Kiran Mane on Janhvi Kapoor : किरण माने (Kiran Mane) यांच्या पोस्ट सध्या बऱ्याच चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची स्पष्ट मंत मांडली आहेत. त्यातच आता त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूरचं कौतुक केलं आहे. जान्हवीने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान गांधी-आंबेडकर मुद्द्यावरही काही स्पष्ट मुद्दे मांडले आहेत. त्यावर किरण माने यांनी तिचं कौतुक करत मराठी अभिनेत्री आणि अभिनेते यांना टोला लगावला आहे.
जान्हवी कपूर हिने काय म्हटलं?
जान्हवी कपूर हिने गांधी-आबंडेकरांच्या मुद्द्यावर लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट भाष्य केलं आहे. यावेळी तिनं म्हटलं की, 'गांधी आणि आंबेडकर यांच्यतील वाद पाहणं हे खरचं खूप उत्सुकतेचा विषय हे. पुणे करारावेळी आंबेडकरांचे आणि गांधीचे एक विषयावरुन विचार कसे बदलत गेले. त्यांनी एकमेकांना कशी मदत केली, त्यांना एकमेकांविषयी काय वाटयचं याविषयी ऐकणं पाहणं मला आवडतं. आंबेडकरांचे हे त्यांच्या विचारांवर सुरुवातीपासूनच खूप ठाम होते. पण गांधींचे विचार हे सातत्याने बदलत गेले. कारण आपल्या देशात जो जातीयवाद आहे, त्यावर इतर तिसऱ्या व्यक्तीकडून त्यावर मतं घेणं आणि तो प्रत्यक्ष जगण यात बराच फरक आहे.' तुझ्या शाळेत कधी जातीयवादाच्या मुद्द्यावर भाष्य झालं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवीने म्हटलं की, 'नाही माझ्या शाळेतही नाही आणि माझ्या घरातही जातीवरुन कधीच कोणतं भाष्य झालं नाही.'
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी जान्हवीचा हा व्हिडिओ शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी. एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय. अनुभवलाय, त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हाॅटस् ॲपवर फाॅर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही ! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं.'