मुंबई : भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक, विदेशी गुंतवणूकदांकडून केली जात असलेली विक्री यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी अस्थिरता निर्माण झाली आहे. पण तरीदेखील सेन्सेक्स, निफ्टीने आजच्या सत्राक नवा इतिहास रचला. आज  निफ्टीने आज पहिल्यांदाच 23 हजारांचा टप्पा ओलांडला. दरम्यान सध्या शेअर बाजारात अनिश्चितता कायम असली तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. अशाच काही कंपन्यांची माहिती खाली दिलेली आहे. या कंपन्यांनी गेल्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. 


Garden Reach Shipbuilders & Enginers Ltd


गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स या कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी 19 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी हा शेअर 1418 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी हा शेअर 1461.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही एक जहाजनिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून नौसेना आणि तटरक्षक दलासाठी लागणाऱ्या जहाजांच्या निर्मितीत मदत करते. 16 मे 2024 रोजी या कंपनीचा शेअर 987.95 रुपयांवर होता. 23 मे 2024 रोज हा शेअर 1426.55 रुपयांवर पोहोचला. फक्त 6 ट्रेडिंग सेशन्समध्ये या स्टॉकने 44.39 टक्के रिटर्न्स दिले आहेत.


Mazagon Dock Shipbuilders Ltd


माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही एक पीएसयू सेक्टरमधील कंपनी आहे. ही कंपनी भारतीय संरक्षण दलाअंतर्गत येते.  ही कंपनी मुंबई आणि न्हावा येथे पाणबुडी निर्मिती सुधारणा, नुतनीकरण अशी कामे करते. माझगांव डॉक या कंपनीच्या शेअरचे मूल्य गुरुवारी 3,123.95 रुपये होते. आज सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा शेअर 3169.80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कंपनीने 6 ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांना 29.69 टक्के रिटर्न्स दिले आहेत.


Bharat Dynamics Ltd


भारत डायनॅमिक्स लिमिटेड क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षणविषयक उपकरण निर्मितीमध्ये काम करते. गुरुवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1435 रुपये होते. शुक्रवारी या कंपनीचे मूल्य 1552.05 रुपयांपर्यंत वाढले आहे. या कंपनीने 6 सत्रांत 39.75 रिटर्न्स दिले आहेत .


Indian Hume Pipe Company Ltd


इंडियन ह्यूम पाइप कंपनी लिमिटेड पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी प्रमाली आदी प्रकल्पांची निर्मिती आणि दुरुस्तीचे काम करते. गुरुवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 342.50 रुपये होते. शुक्रवारी या शेअरचे मूल्य 328.20 रुपयांपर्यंत घसरले आहे. या कंपनीने मागील सहा सत्रांत साधारण 26 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 


Spectrum Electrical Industries Ltd.


स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड वेगवेगळे अॅप्लीकेशन, यूटिलिटी तसेच इलेक्ट्रिक कंम्पोनंटची डिझाईन आणइ निर्मिती क्षेत्रात काम करते. या कंपनीने गेल्या सहा सत्रांत 32.41 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य हे 1882.25 रुपये आहे. 


Hindustan Zinc Ltd


हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीने गेल्या सहा सत्रांत गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


व्होडाफोन आयडियाचा शेअर सुस्साट, 'बाय रेटिंग'मुळे चक्क 10 टक्क्यांची वाढ; भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल?


मॅटर्निटी पॉलिसीचं नेमकं महत्त्व काय? सोप्या पद्धतीने समजून घ्या!