मुंबई : घटस्फोट एक अशी प्रक्रिया आहे, जिच्यामुळे फक्त पती-पत्नीच नव्हे तर दोन परिवारदेखील एकमेकांपासून दुरावतात. घटस्फोटाचा परिणाम दाम्पत्याच्या मुलांवरही पडतो. विशेष म्हणजे घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे फक्त भावनिक स्तरावरच नव्हे तर आर्थिक पातळीरदेखील अनके बदल होतात. घटस्फोटाचा विषय आला की अनेकवेळा महिलांच्या अधिकारांविषयी चर्चा केली जाते. पण याच प्रक्रियेत पुरुषांनाही काही अधिकार असतात का? संपत्तीची वाटणी कशी होते? पुरुषांना मिळालेल्या त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचे काय होते? हे जाणून घेऊ या... 


घटस्फोटाच्या प्रक्रियेत कोणाचे काय अधिकार असतात? 


घटस्फोटाच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. घटस्फोट घेताना पत्नीचे जसे अधिकार असतात तसेच पतीचेही काही अधिकार असतात. पत्नीच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेल्या भेटवस्तूंवर पतीचा अधिकार असतो. लग्नाच्या अगोदर, लग्नात किंवा  लग्नानंतर पत्नीच्या आई-वडिलांनी ज्या भेटवस्तू दिलेल्या असतात त्यावर पतीचा अधिकार असतो.   


कोणतीही संपत्ती जी पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेली आहे आणि ती भेट म्हणून दिलेली नाही, अशा संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो.   


पत्नीने एखादी संपत्ती स्वत: खरेदी केलेली असेल तर ती त्या संपत्तीवर दावा करू शकते. सर्वच संपत्तीवर पत्नीला दावा करता येत नाही. 


पती-पत्नी यांनी सोबत मिळून एखादी वस्तू किंवा संपत्ती खरेदी केलेली असेल आणि त्यासाठी पती आर्थिक पुरवठा करत असेल तर अशा संपत्तीच्या बाबतीत पतीचा दावा मजबूत ठरू शकतो.   


एखादी संपत्ती पती आणि पत्नी यांनी एकत्र मिळून खरेदी केलेली आहे तसेच त्या संपत्तीसाठी दोघांनाही कर्ज घेतलेले आहे तर अशा स्थितीत या संपत्तीचे दोघांमध्येही विभाजन होते. दोघांनीही संपत्ती खरेदी करण्यासाठी किती योगदान दिलेले आहे हे लक्षात घेऊन संबंधित संपत्तीच्या विभाजनाचे प्रमाण ठरवले जाते. 


पतीने एखादी वस्तू स्वत: खरेदी केलेली आहे आणि त्या वस्तूचे पैसे स्वत:च दिलेले आहेत तर ती वस्तू, संपत्ती ही पतीची असते. दुसरीकडे एखादी संपत्ती ही पतीने खरेदी केलेली आहे पण ती पत्नीच्या नावावर आहे, तर ती संपत्ती पत्नीला मिळू शकते. संबंधित संपत्तीचे पैसे मीच दिलेले आहेत, हे पती सिद्ध न करू शकल्यास ही संपत्ती पत्नीला मिळते. एखादी संपत्ती पतीला पूर्वजांकडून मिळालेली असेल तर त्यावर पत्नी दावा करू शकत नाही. 


हेही वाचा :


SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!


रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?


श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!


पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?