तेंडुलकर, धोनी, कोहली एवढे श्रीमंत कसे काय? पैसे कसे कमवतात? जाणून घ्या उत्पन्नाचा स्त्रोत!
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी नेमकं पैसे कसे कमवतात, असे विचारले जाते. त्यांच्या उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत आहेत.

मुंबई : क्रिकेटर्सच्या जीवनशैलीची प्रत्येकालाच भूरळ असते. त्यांची फॅनफॉलोइंग पाहून प्रत्येकालाच त्यांच्यासारखं नाव कमवावं वाटतं. प्रसिद्धी आणि पैसा असं दोन्हीही त्यांच्याकडे असतं. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा आज प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर आहेत. त्याची संपत्ती आज कोटींच्या घरात आहेत. हे क्रिकेटपटू नेमकी कमाई कशी करतात? ते एवढे श्रीमंत नेमके कसे झाले, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे नेमकं कोणकोणत्या माध्यमातून कमाई करतात? हे जाणून घेऊ.
सचिन तेंडुलकर किती रुपये कमवतो?
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्रिकेटमध्ये सचिनचं नाव अग्रकमावर घेतलं जातं. सचिन याच प्रसिद्धीच्या जोरावर आज कोट्याधीश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिनचा कपडे आणि हॉटेलचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार सचिन तेंडुलकरचा ट्रू ब्लू सचिन तेंडुलकर या नावाचा ब्रँड आहे. त्याचे अरविंद फॅशन ब्रँडसोबत जॉइंट व्हेंचर आहे. या फॅशन ब्रँडच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर चांगली कमाई करतो. सचिन तेंडुलकरचा हॉटेलचाही व्यवसाय आहे. यासह सचिन तेंडुलकर हा जगप्रसिद्ध चेहरा असल्यामुळे तो वेगवेगळ्या ब्रँडचा प्रचार करतो. ब्रँड्सचा प्रचार करून तो वर्षाला 20-22 ते कोटी रुपये कमवतो. सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये आहे.
विराट कोहली किती कोटींचा मालक?
विराट कोहली हादेखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच कोट्यवधी रुपये कमवतो. मिळालेल्या माहितीनुसार कोहलीने अनेक दिग्गज कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. कोहलीने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Galactus Funware Technology Pvt. Ltd, Sport Convo आणि गो Digit आदी कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. यासह सोशल मीडिया पोस्ट, ब्रँड प्रमोशन आदी माध्यमातूनही विराट कोहली पैसे कमवतो. विराट कोहलीची एकूण संपत्ती 1046 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
महेंद्रसिंह धोनी नेमके किती रुपये कमवतो?
महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. तो सध्या आयपीएल खेळतो.धोनी अजूही क्रिकेटच्या माध्यमातून पैसे कमवतो. यासह धोनीचे इतरही काही व्यवसाय आहेत. 2016 साली त्याने धोनी रीति स्पोर्ट्स नावाची एक कंपनी चालू केली होती.2016 साली त्याने कपडे आणि फुटविअरचाही व्यवसाय चालू केला होता. यातून धोनीची चांगली कमाई होते. धोनीची एकूण संपत्ती 1,040 कोटी रुपये आहे.
हेही वाचा :
डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार? कशी असेल प्रक्रिया?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

