1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
1 टनचा विंडो एसी बघताय? सर्वोत्तम विंडो एयर कंडिशनर निवडण्यासाठी आणि नो कॉस्ट EMI वर त्याची खरेदी कशी करायची याविषयीचे हे गाईड.
1 टनचा विंडो एसी 100-120 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी उत्तम असतो. स्प्लिट एसीसारखे विंडो एसीला दोन स्वतंत्र युनिट्स नसतात आणि भिंतीवर बसवण्याची गरज नसते. त्याऐवजी, खिडकीच्या चौकटीवर एसी बसवता येतो. नवीनतम विंडो एसीमध्ये इन्व्हर्टर तंत्रज्ञान आणि फिल्टर्ससारखे प्रगत वैशिष्ट्य व टायमर फंक्शन आहे.
भारतातील अनेक टॉप ब्रँड्स 1 टनचे विंडो एसी देऊ करतात. मात्र, पहिल्यांदाच खरेदी करणार्यांना उपकरण बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे आणि उत्तम 1 टन विंडो एसी शोधणे आव्हानात्मक ठरू शकते. सादर आहे 1 टन एयर कंडिशनर्सवरील एक सर्वसमावेशक गाईड. यात आहे उत्तम विक्री होणारे ब्रँड्स, युनिट खरेदी करताना विचारात घ्यावयाच्या गोष्टी, एसीची किंमत आणि अर्थसहाय्याचे पर्याय.
तुमचे बजेट अधिक सुलभ करण्यासाठी, 1 टन एसी खरेदी करताना बजाज फिनसर्व्ह EMI नेटवर्क कार्ड वापरण्याचाही विचार करा. या कार्डमुळे तुम्ही तुमची खरेदी नो कॉस्ट EMI मध्ये रुपांतरित करू शकता. कोणत्याही बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरला भेट द्या, तुमच्या आवडीचे एयर कंडिशनर निवडा आणि तुमचे बजाज फिनसर्व्ह EMI नेटवर्क कार्ड तपशील चेकआऊटच्या ठिकाणी द्या.
1 टन एसी विकत घेताना काय बघावे
1 टन विंडो एसी खरेदी करताना अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यातील काही पैलू खाली अधोरेखित केले आहेत:
- रूम लेआऊट: विशिष्ट स्क्वेअर फुटांसाठी जसे 100 ते 120 स्क्वेअर फुट, 1 टन एसी अगदी योग्य असतो. मात्र, ही फक्त एक सर्वसामान्य नियमावली आहे आणि या क्षेत्रात फक्त फ्लोअर स्पेस विचारात घेतली आहे. फ्लोअर स्पेस मर्यादेत असली तरी उंच छत असलेल्या खोलीला थंड करण्यासाठी 1 टन विंडो एसीपेक्षा जास्त क्षमता लागू शकते. त्यामुळे, तुम्ही जो एसी खरेदी करण्याचा विचार करीत आहात तो तुमच्या खोलीसाठी योग्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या खोलीचे अचूक आकारमान घ्या.
- ऊर्जा कार्यक्षमता: उच्च BEE स्टार रेटिंग असलेला एसी पहा. जेवढे जास्त रेटिंग तेवढा एसी ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेनॊ वापर करणारा. 1 टन 5 स्टार विंडो एसीची किंमत तशाच 3 स्टार एसी पेक्षा जास्त असेल पण दीर्घकालात विजेच्या बिलात अधिक बचत करण्यात त्याचे योगदान असेल, अशाप्रकारे जास्त किंमतीची भरपाई होते.
- इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी: तुम्ही इन्व्हर्टर कॉम्प्रेसर असलेल्या एसीची निवड करू शकता जो आवाज न करता काम करतो आणि आणखी ऊर्जा वापर कमी करतो. हे एसी दीर्घकाळ चालतात आणि जास्त टिकाऊ असतात.
इतर वैशिष्ट्ये: तुम्हाला जास्त आराम आणि सोय देणार्या डिह्युमिडिफिकेशन मोड, डस्ट आणि अँटि-व्हायरस फिल्टर्स आणि स्लिप मोड या वैशिष्ट्यांचा विचार करा. उदा. डस्ट फिल्टर असलेला 1 टन विंडो एसी धूळ आणि हवेतून पसरणारे दूषित घटक प्रभावीपणे काढू शकतो ज्यामुळे घरातील वातावरण सुरक्षित होते.
टॉप कामगिरी करणारे 1 टन विंडो एसी
- पॅनासॉनिक 1 टन 5 BEE स्टार रेटिंग विंडो एसी व्हाईट (कॉपर कन्डेंसर, CW-XN121AM)
या पॅनासॉनिक विंडो एसीला आहे कॉपर कन्डेन्सर ज्यामुळे तो जास्तीत जास्त थंडावा देत दीर्घकाळ चालतो. डस्ट आणि अँटि-बॅक्टेरियल फिल्टर्समुळे हवेतून पसरणारे दूषित घटक दूर होऊन स्वच्छ आणि निरोगी हवेचा प्रवाह तयार होतो. जास्तीच्या आरामासाठी, युनिटला ऑटो रिस्टार्ट फंक्शन आहे ज्यामुळे त्याच सेटिंगमध्ये वीज पुरवठा बंद झाल्यावर आपोआप काम सुरु होते. याशिवाय डिह्युमिडिफिकेशन मोडमध्ये अतिरिक्त आर्द्रता शोषून बाहेर टाकली जाते त्यामुळे तुम्हाला जास्त आराम मिळण्याची सुनिश्चिती होते.
तपशील: पॅनासॉनिक 1 टन 5 BEE स्टार रेटिंग विंडो एसी व्हाईट (कॉपर कन्डेंसर, CW-XN121AM) |
|
थंड करण्याची क्षमता |
3,450 W |
स्टार रेटिंग |
5 स्टार |
इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर |
नॉन-इन्व्हर्टर |
वैशिष्ट्ये |
अँटि-बॅक्टेरिया फिल्टर, डस्ट फिल्टर, ऑटो रिस्टार्ट, डिह्युमिडिफिकेशन, रिमोट कंट्रोल ऑफरेशन |
परिमाण (रुंदी x उंची xखोली) |
71 cm x 43 cm x 66 cm |
वजन |
47 kg |
- व्हर्लपूल 1 टन 5 स्टार विंडो एसी (WAC MAGICOOL COPR 5S)
या 1 टन विंडो एसीमध्ये हवेतून पसरणारे दूषित घटक हाताळणारे डस्ट फिल्टर आणि अपायकारक सूक्ष्मजंतुंशी लढा देणारे अँटि-बॅक्टेरियल फिल्टर अंतर्निहित आहे. याशिवाय, एसी आवाज न करता, अधिक किफायतशीरपणे ऊर्जा वापरुन काम करेल याची सुनिश्चिती स्लीप मोड करते. व्हर्लपूलची सिक्स्थ सेन्स एनर्जी सेव्हर टेक्नॉलॉजी खोलीच्या तापमानानुसार जास्तीत जास्त थंडावा देते यामुळे ऊर्जा बचत वाढते.
तपशील: व्हर्लपूल 1 टन 5 स्टार विंडो एसी (WAC MAGICOOL COPR 5S) |
|
थंड करण्याची क्षमता |
3,500 W |
स्टार रेटिंग |
5 स्टार |
इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर |
नॉन-इन्व्हर्टर |
वैशिष्ट्ये |
ऑटो स्टार्ट, स्लीप मोड, सेल्फ-डायग्नोसिस, डस्ट फिल्टर, अँटि-बॅक्टेरिया फिल्टर, टर्बो कूल |
परिमाण (रुंदी x उंची xखोली) |
66 cm x 43 cm x 70.5 cm |
वजन |
24 kg |
- LG 1 टन 5 स्टार इन्व्हर्टर विंडो एखी व्हाईट (कॉपर कन्डेन्सर, PW-Q12WUZA)
एसीचे ड्युएल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर पारंपरिक मॉडेल्सपेक्षा जलद थंड करण्यासाठी आणि आवाज न करता काम करण्यासाठी व्यापक परिभ्रमण वारंवारिता प्रदान करतो. या तंत्राज्ञानाचा अर्थ आहे वाढीव ऊर्जा बचत आणि वाढीव टिकाऊपणा. 1 टन विंडो एसी देऊ करतो 4-इन-1 रुपांतरित होणारी कार्यक्षमता देते सानुकूलित गारवा. LG थिंकक्यू (ThinQ) आणि व्हॉइस कंट्रोल वैशिष्ट्य विलक्षण आहे, तुम्ही कुठूनही दुरून एसीवर लक्ष ठेवू शकता आणि हाताळू शकता.
तपशील: LG 1 टन 5 स्टार इन्व्हर्टर विंडो एखी व्हाईट (कॉपर कन्डेन्सर, PW-Q12WUZA) |
|
थंड करण्याची क्षमता |
3,200 W |
स्टार रेटिंग |
5 स्टार |
इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर |
ड्युएल इन्व्हर्टर |
वैशिष्ट्ये |
4-इन-1 कुलिंग, व्हॉइस कंट्रोल, ऑटो रिस्टार्ट, रिमोट कंट्रोल, स्मार्ट डायग्नोसिस |
परिमाण (रुंदी x उंची xखोली) |
600 mm x 380 mm x 731 mm |
वजन |
11 kg |
- लॉइड 1 टन 3 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, GLW12B32WSEW)
भरपूर वैशिष्ट्ये असलेला या एसीला आहे सेल्फ डायग्नोसिस फंक्शन जे पॉवर ऑन असताना दोष शोधते आणि दर्शवते. याची सशक्त डिह्युमिडिफिकेशन प्रणाली खोलीचे तापमान कमी न करता अतिरिक्त आर्द्रता हाताळते. सहज कार्यासाठी, वीज पुरवठा बंद झाल्यास आधीच्या सेटिंगप्रमाणे एसी आपोआप रिस्टार्ट होतो. याशिवाय, कॉपर कन्डेन्सर जलद उष्णता हस्तांतरण सुनिश्चित करते ज्यामुळे लवकर कुलिंग होते, गंजण्याला प्रतिरोध होतो आणि टिकाऊपणा वाढतो.
तपशील: लॉइड 1 टन 3 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, GLW12B3YWSEW) |
|
थंड करण्याची क्षमता |
3,400 W |
स्टार रेटिंग |
3 स्टार |
इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर |
नॉन-इन्व्हर्टर |
वैशिष्ट्ये |
रिमोट ऑपरेशन, ऑटो रिस्टार्ट, डिह्युमिडिफिकेशन, सेल्फ-डायग्नोसिस |
परिमाण (रुंदी x उंची xखोली) |
60 cm x 57 cm x 38.5 cm |
वजन |
38 kg |
- हिताची 1 टन 5 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, RAW511HEDO)
या 1 टन विंडो एसीला आहे स्लीप मोड ज्यामुळे रात्रीच्या वेळी कुलिंग होते आवाज न करता आणि किफायतशीर ऊर्जा वापरुन. यात अंतर्भूत असलेले डस्ट फिल्टर धूळ आणि वायुजन्य कण हाताळते तर आर्द्रतेला हाताळण्यासाठी आहे डिहुमिडिफिकेशन फंक्शन. याशिवाय, एसीमध्ये असलेले रोटरी कॉम्प्रेसर, कमी ऊर्जा वापरुन युनिटची उच्च कार्यक्षमता सुनिश्चित करते.
तपशील: हिताची 1 टन 5 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, RAW511HEDO) |
|
थंड करण्याची क्षमता |
3,516 W |
स्टार रेटिंग |
5 स्टार |
इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर |
नॉन-इन्व्हर्टर |
वैशिष्ट्ये |
ऑटो रिस्टार्ट, रिमोट कंट्रोल, स्लीप मोड, टायमर, डस्ट फिल्टर, डिह्युमिडिफिकेशन |
परिमाण (रुंदी x उंची xखोली) |
66.6 cm x 43.6 cm x 76.1 cm |
वजन |
52 kg |
टॉप विक्री असणारा 1 टन विंडो एसी
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाशी भारत झुंजत असताना, 1 टन विंडो एसी हे भारतीय घरांमध्ये एक आवश्यक उपकरण बनले आहे. बजेटप्रती सजग असलेले ग्राहक खिशाला परवडणार्या किंमतीमुळे 1 टन विंडो एसी निवडतात. तुम्हाला किमतींची तुलना करण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी, हा तक्ता, उपलब्ध सर्वाधिक विकले जाणारे विंडो एसी तुमच्या निरीक्षणासाठी सादर करते.
मॉडेल |
किंमत |
क्रोमा 1 तन 5 स्टार विंडो एसी (कॉपर कन्डेन्सर, डस्ट फिल्टर, CRLA012WAF193302) |
रु. 30,990 |
पॅनासॉनिक 1 टन 5 BEE स्टार रेटिंग विंडो एसी व्हाईट (कॉपर कन्डेंसर, CW-XN121AM) |
रु. 25,990 |
व्हर्लपूल 1 टन 5 स्टार विंडो एसी (WAC MAGICOOL COPR 5S) |
रु. 28,000 |
LG 1 टन 5 स्टार इन्व्हर्टर विंडो एखी व्हाईट (कॉपर कन्डेन्सर, PW-Q12WUZA) |
रु. 32,500 |
लॉइड 1 टन 3 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, GLW12B3YWSEW) |
रु. 24,499 |
हिताची 1 टन 5 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, RAW511HEDO) |
रु. 30,600 |
LG 1 टन 5 स्टार इन्व्हर्टर विंडो एसी व्हाइट (JW-Q12WUZA) |
रु. 32,870 |
व्हर्लपूल 1 टन 3 स्टार विंडो एसी व्हाइट (WAR12B36M0) |
रु. 28750 |
लॉइड 1 टन 3 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, GLW12B3YWSEW) |
रु. 23,199 |
ओ जनरल 1 टन 4 स्टार विंडो एसी व्हाइट (कॉपर कन्डेन्सर, AFGB12BAWA-B-4S) |
रु. 36,840 |
भारतातील कडक उन्हाळ्यात 1 टन एअर कंडिशनर अनेकांसाठी एक आवश्यक खरेदी बनत असताना, एसीची किंमत एक अडथळा ठरू शकते. सुदैवाने, बजाज फिनसर्व्ह EMI नेटवर्क सोयीचा उपाय देऊ करते, याद्वारे तुम्ही खास डिल्स, सूट आणि ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीचा 1 टन विंडो एसी नो कॉस्ट EMI वर खरेदी करू शकता आणि 1-60 महिन्यांमध्ये तो खर्च विभागू शकता.
1 टन एसी खरेदीसाठी बजाज फिनसर्व्ह EMI नेटवर्क कार्डद्वारे अर्थसहाय्याचा लाभ कसा घ्यायचा ते पहा:
- पायरी 1: बजाज मॉल संकेतस्थळाला भेट द्या आणि विविध ब्रँड्सच्या 1 टन विंडो एसींची श्रेणी बघा. तुमच्या कल्पनेशी जुळणारा एसी शोधण्यासाठी वैशिष्ट्ये, क्षमता आणि किंमत यानुसर फिल्टर करा.
- पायरी 2: विंडो एसी विक्री करणार्या तुमच्या जवळील बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरचा शोध घ्या. स्टोअरला भेट द्या, तेथिल उपलब्ध एसी बघा आणि मॉडेल शोधा.
- पायरी 3: तुमच्या बजाज फिनसर्व्ह EMI नेटवर्क कार्डने चेक-आऊट काउंटरवर उत्पादनाचे पैसे भरा. तुमच्या EMIची कालावधीची पुष्टी करुन घ्या आणि स्टोअरमधील प्रतिनिधीसोबत तुमच्या EMI नेटवर्क कार्डचा तपशील सामायिक करा.
- पायरी 4: प्रमाणीकरणासाठी तुमच्या नोंदणीकृत नंबरवर वन-टाइम पासवर्ड पाठवला जाईल. एकदा पुष्टी झाल्यानंतर, खरेदी पूर्ण होते, आणि तुमचा एसी तुम्ही नो कॉस्ट EMIसाठी पैसे भरत असतानाच वितरित केला जाईल.