एक्स्प्लोर

Home Loan EMI Calculator : 1 कोटींच्या गृहकर्जाची परतफेड करताना 6.85 लाख कसे वाचवायचे? EMI मध्ये दरमहा 2000 रुपये जास्त भरल्यास डबल फायदा,जाणून घ्या

Home Loan : भारतात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्यानं शहरांकडे स्थलांतर वाढलंय. यामुळं शहरात घर खरेदी करण्यासाठी अनेक जण गृहकर्जाचा पर्याय स्वीकारतात. 

Home Loan मुंबई :  नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता किंवा पुणे या सारख्या महानगरांमध्ये असो की छोट्या शहरांमध्ये घर खरेदी करायचं असल्यास बहुतांश लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्ज काढण्यासाठी मग सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज घ्यावं लागतं. गृहकर्जाचा कालावधी दीर्घ असल्यानं जितकं कर्ज घेतलंय, जवळपास तेवढीच रक्कम गृहकर्जाच्या व्याजाच्या रुपात बँकांना मिळत असते. सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा कालावधी 15 ते 25 वर्षांच्या दरम्यान असतो. दरमहा ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक भरुन  6 लाखांहून अधिक रक्कम कशी वाचवायची ते जाणून घेणार आहोत. 

समजा एखाद्या कर्जदारानं 1 कोटी रुपयांचं कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं आणि त्याचा व्याज दर 8.25 टक्के असेल तर त्याला मासिक हप्ता 85207 हजार रुपये भरावा लागतो. एखाद्या कर्जदारानं  पूर्ण कालावधी संपेपर्यंत कर्जाची परत फेड केल्यास त्याला 2.04 कोटी रुपये भरावे लागतात. म्हणजेच तो 1.04 कोटी रुपये व्याजापोटी भरतो. मात्र, ईएआयमध्ये थोडा बदल केल्यास मोठा बदल दिसून येऊ शकतो.  मासिक ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक जमा केल्यास काय परिणाम होतो ते जाणून घेणार आहोत. 

Home Loan EMI : गृहकर्जाचा ईएमआय वाढवल्यास किती फायदा?

1 कोटी रुपयांच्या गृहकर्जाचा 20 वर्षांचा विचार केल्यास 240 महिने 8.25 टक्के व्याज दरानं दरमहा हप्ता 85207 रुपये भरावा लागेल. यामध्ये 2000 रुपयांची वाढ केल्यास हप्त्याची रक्कम 87207 रुपये होईल. 85207 रुपयांच्या नियमित परतफेडीनुसार कर्जदाराला 2 कोटी  4 लाख 49 हजार 680 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक भरल्यास 87207 रुपये हप्ता भरणे सुरु ठेवल्यास 240 महिन्यांचं गृहकर्ज 227 महिन्यात संपेल. म्हणजेच 20 वर्षांचं कर्ज 18 वर्ष 11 महिन्यात संपेल. कर्जदार 227 महिन्यात 1 कोटी 97 लाख 64 हजार 951 रुपये व्याज आणि मुद्दल मिळून भरेल. या कालावधीत कर्जदार व्याज म्हणून जी रक्कम जमा करेल ती 97 लाख 64 हजार 951 रुपये होईल. यामुळं गृहकर्जदाराचे 6 लाख 84 हजार 729 रुपयांची बचत होईल. 

तुम्ही गृहकर्ज घेतल्यानंतर ते प्रामुख्यानं दीर्घकाळासाठी असते. कर्ज परतफेडीच्या सुरुवातीच्या दिवसात ईएमआयमधील मोठी रक्कम व्याज म्हणून जाते. तर, मुद्दलात खूप कमी रक्कम जमा होते. 85207 रुपये ईएमआय असेल तर त्यापैकी 68750 रुपये व्याज म्हणून जातात. तर, मुद्दलात 16457  रुपये ते 18457 रुपये जातात. ईएमआयसोबत 2000 रुपये अधिक जमा केल्यास ते थेट मुद्दलाच्या रकमेत जमा होतात.  

गृहकर्ज कमी व्याज दरावर घेण्यासोबतच त्याची स्मार्टपणे परतफेड करणं आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नानुसार ईएमआयची रक्कम थोडी री वाढवली तर तुम्ही भविष्यात मोठी रक्कम वाचवू शकता. 

दरम्यान, गृहकर्जाची परतफेड करताना किंवा ईएमआयमध्ये अधिक रक्कम जमा करताना बँकेच्या नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे. प्रीपेमेंटचे नियम, ईएमआयमधील बदल आणि इतर अटी जाणून घेणं आवश्यक आहे. मात्र, ईएमआयमध्ये थोडीशी वाढ केल्यास तुम्ही दीर्घकाळात मोठी बचत करु शकता.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget