HAL Share Price: या आठवड्यात सोमवारी (18 जून) शेअर बाजार बंद होता. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच आज शेअर बाजारात मोठ्या घडामोडी दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य वाढण्याच शक्यता आहे. यातही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ( DEfence Ministry) नुकतेच एचएएल (HAL) ला 156 लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसाठी निविदा जारी केली आहे.
156 हेलिकॉप्टर्ससाठी मिळाली ऑर्डर
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या निविदेबद्दल खुद् या कंपनीनेच सेबीला सांगितले आहे. आम्हाला भारतीय संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) आम्हाला 156 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरर्ससाठी (Light Combat Helicopter) आरएफपी (RFP) जारी केली आहे. यामध्ये 90 हेलिकॉप्टर इंडियन आर्मीसाठी (Indian Army) तर 66 हेलिकॉप्टर्स हे भारतीय वायू सेनेसाठी तयार केले जाणार आहेत.
याच वर्षात संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायू सेनेसाठी 97 लाइट कॉमबॅट एअरक्रफ्ट (LCA Mk-1A) तेजस (Tejas) साठी डेंटर जारी केले होते. नोव्हेंबर 2023 मध्ये डीएसीने ( Defence Acquisition Council) 97 तेजस विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 67,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या कंपनीने गुंतवणूकदारांनी किती टक्क्यांनी रिटर्न्स दिले?
दरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डर्समुळे गेल्या काही दिवसांत या कंपनीचा शेअर चांगलाच वधारलेला आहे. 14 जून 2024 या दिवशी शेअर बाजार चालू असताना या कंपनीच्या शेअरमध्ये 1.89 टक्क्यांनी वाढ झाली होती. 14 जून रोजी हा शेअर 5199.60 रुपयांवर पोहोचला होता. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणालाही बहुमत न मिळाल्यामुळे 5 जून रोजी हा शेअर 3918 रुपयांपर्यंत घसरला होता. त्यानंतर मात्र या शेअरमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. 5 जूननंतर हा शेअर 1300 रुपयांपर्यंत वाढला आहे. एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्लस लिमिटेड या शेअरने गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. एका वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 180 टक्के, 2 वर्षांत 450 टक्के तर 3 वर्षांत 900 टक्के, 5 वर्षांत 1400 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
हेही वाचा :
बापरे! एक लाखाचे झाले तब्बल 29 लाख रुपये, 'या' कंपनीच्या शेअर्समुळे तुम्ही झाले असता मालामाल!
आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा होऊ शकते मोठी अडचण!
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस