How To Block Google Pay and PhonePe Account : जवळपास आज प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट्ससाठी करत आहेत. UPI द्वारे छोटीमोठी बिलेही भरली जातात. त्यासाठी गुगल पे (Google Pay) अथवा फोन पे (PhonePe ) यासारख्या लोकप्रिय ॲप्सचा वापर केला जातो. पण तुमचा मोबाईल हरवला तर काय? PhonePe आणि Google Pay ची खाती कशी बंद करायची? याचा तुम्ही कधी विचार केलाय? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. PhonePe आणि Google Pay खाते ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात..
तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केल्यानंतर ऑनलाइन पेमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोख रकमेऐवजी अवघ्या 5 रुपयांसाठीही कधीकधी ऑनलाइन पेमेंट केले जातं. ऑनलाइन पेमेंटसाठी म्हणजेच UPI पेमेंटसाठी, अॅप्सचा वापर केला जातो. PhonePe आणि Google Pay यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा अनेकांकडून पसंती दिली जाते. पण मोबाईल फोन हरवला तर काय? आर्थिक नुकसान होऊ शकते. गूगल पे (Google Pay) आणि फोनेपे (Phone Pay) हे ॲप्स तुम्हीही वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला, तर तुम्ही सर्वप्रथम हे ॲप्स ब्लॉक करा. पण हे अॅप्स कसे ब्लॉक करायचे? याबाबत स्टेब बाय स्टेब जाणून घेऊयात...
PhonePe खातं कसं ब्लॉक कराल? How To Block PhonePe Account
स्टेप1 : फोन पे खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 08068727374 यावर कॉल करावा लागेल.
स्टेप 2 : कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला खातं ब्लॉक करण्याबाबात सांगावं लागेल. खात्याबाबत सर्व डिटेल्स माहिती द्यावी लागेल.
स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.
कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला कोणती माहिती द्यावी लागेल ? -
कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला तुम्हाला नोंदणीकृत (रजिस्टर्ड मोबाइल) मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्याशिवाय ईमेल आयडी द्यावा लागेल.
अखेरची पेमेंट डिटेल्स सांगावे लागेल.
बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहितीही द्यावी लागणार...
अल्टरनेटिव्ह मोबाईल क्रमांकही सांगावा लागेल.
गूगल पे खातं कसं ब्लॉक कराल? How To Block Google Pay Account
स्टेप 1: Google Pay खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी हेल्पलाइन नंबर 1800-419-0157 यावर कॉल करावा लागेल.
स्टेप 2: त्यानंतर कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हलाला गूगल पे खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल, अन् खातं ब्लॉक करण्याची विनंती करावी लागेल.
स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.