मुंबई : हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी (HPCL) गेल्या काही दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहे. नुकतेच या कंपनीने आपल्या गुंतवणूकादारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट 21 जून 2024 आहे.  या कंपनीन एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर आज त्याच पैशांचे तब्बल 29 लाख रुपये झाले आहेत. गेल्या काही वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे ही कंपनी आगामी काळातही चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


...तर एका लाखाचे झाले असते 29 लाख रुपये


एचपीसीएल या कंपनीच्या शेअरचे मूल्य 11 जुलै 2014 रोजी 83.68 रुपये होते. त्यावेळी एखाद्या व्यक्तीने समजा एक लाख रुपये गुंतवले असते तर त्या व्यक्तीला एकूण 1194 शेअर्स मिळाले असते. त्यानंतरच्या दहा वर्षांत या कंपनीने अनेकवेळा बोनस शेअर दिले आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीत या एक लाख रुपयांच्या शेअर्सची संख्या ही 5372 एवढी झाली असती. आज एचपीसीएल कंपनीच्या शेअरचे मूल्य हे 536 रुपये आहे. म्हणजेच या 5372 शेअर्सचे मूल्य जवळपास 29 लाख रुपये झाले असते.


एका वर्षात 96 टक्क्यांनी रिटर्न्स 


हिंदुस्तान पेट्रोलियन या कंपपनीने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 96 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. लवकरच हा शेअर 565 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे ब्रोकरेज कंपन्यांचा अंदाज आहे. 15 जून रोजी हा हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या शेअरचे मूल्य  273. 85 रुपये होते.


दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्यांना चांगला परतावा  


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे बाजार भांडवल हे 76000 कोटी रुपये आहे. ही एक ऑईल मार्केटिंग कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य हे 595 रुपये तर 52 आठवड्यांतील निकांची मूल्य 239 रुपये आहे. सध्या या कंपनीचा शेअर तुलनेने चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. गेल्या एका महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 6 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. पण सहा महिन्यांची तुलना करायची झाल्यास या कंपनीने गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. चाल वर्षात या कंपनीने आतापर्यंत 34 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. पाच वर्षांची तुलना करायची झाल्यास गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या या परताव्याचे प्रमाण 84 टक्के आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा शेअर 34.64 रुपयांवर होता. तेव्हापासून या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1450 टक्क्यांनी बम्पर रिटर्न्स दिले आहेत.


हेही वाचा :


केंद्राची आपल्या कर्मचाऱ्यांना तंबी! काम करताना आळशीपणा केल्यास होणार कठोर कारवाई


आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा होऊ शकते मोठी अडचण!


Assessment Year आणि Financial Year म्हणजे नेमकं काय? त्याचा आयटीआरशी संबंध काय? जाणून घ्या!