आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा होऊ शकते मोठी अडचण!
सध्या नोकरदार वर्गाची आयटीआर भरण्यासाठी लगबग चालू आहे. येत्या 31 जुलैपर्यंत आयटीआर म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार आहे. मात्र आयटीआर भरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण ही काळजी न घेतल्यास ऐनवेळी मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आयटीआर भरताना काय चुका करून नये हे समजून घेऊ या. आयटीआर भरताना योग्य फॉर्मची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळे फॉर्म असतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म भरणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमची आयटीआर फाईलींगची प्रोसेस पूर्म न होण्याची भीती असते. तसेच तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटसही येऊ शकते.
आयटीआर भरताना योग्य ते असेसमेंट इअर निवडायला हवे. असेसमेंट इअर चुकल्यास तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. तसेच आर्थिक दंडालाही सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष 2023-24 साठी असेसमेंट इअर हे 2024-25 आहे.
आयटीआर भरताना स्वत:ची योग्य आणि खरी माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचा पत्ता, नाव बरोबर टाकत आहात ना, याची खात्री करून घ्या. तसेच पॅनकार्ड, बँक खाते याची माहिती बरोबर टाकणे गरजेचे आहे. ही माहिती चुकीची असेल तर तुम्हाला करपरतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.
आयटीआर भरताना अनेकजण उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड करत नाहीत. पण तसे करणे चुकीचे आहे. सेव्हिंग बँक खात्यावर मिळणारे व्याज, भाड्यातून मिळणारी रक्कम अशा स्वरुपाचे उत्त्पन्नदेखील आयटीआर भरताना दाखवले पाहिजे. एखाद्या उत्पन्नावर करमाफी असली तरीदेखील त्याचा उल्लेख आयटीआर भरताना करायला हवा.
आयटीआर भरताना फॉर्म 26ASt नीट तपासायला हवा. तुमची करकपात व्यवस्थित दाखवण्यात आलेली आहे ना, याची खात्री करा. फॉर्म नंबर 26ASt आणि फॉर्म नंबर 16 यामध्ये तफावत आढळल्यास तुम्हाला करपतावा येण्यास विलंब होऊ शकतो.