GST Collection Feb 2022 : जीएसटी (GST) संकलनाची फेब्रुवारी 2022 साठी आकडेवारी जाहीर झाली आहे. फेब्रुवारी 2022 साठी एकत्रित GST महसूल 1,33,026 कोटी रुपये इतका जाहीर करण्यात आला आहे. जीएसटी संकलनाने 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे, तर फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे.
1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ
फेब्रुवारी 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,33,026 कोटी रुपये होते. तर CGST संकलन 24,435 कोटी रुपये, SGST रु. 30,779 कोटी रुपये, IGST रु. 67,471 कोटी रुपये आणि उपकर म्हणजेच सेस 10,340 कोटी रुपये होते. फेब्रुवारी महिन्यात नियमित सेटलमेंटनंतर केंद्र सरकारचा महसूल 50,782 कोटी रुपये आहे, तर राज्यांचा एकूण महसूल 52,688 कोटी रुपये आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये GST महसूल संकलन 18 टक्क्यांनी वाढले असताना, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयातीतून महसुलात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जानेवारी महिन्याच्या तुलनेत मात्र घट
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे यंदाच्या जीएसटी संकलनावर परिणाम झाला. जानेवारी 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,40,986 कोटी रुपये होते. आता फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 18 टक्क्यांनी वाढून 1.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे फेब्रुवारीचे संकलन मागील महिन्याच्या तुलनेत घट झालेली दिसून येते.
2021 2022
जानेवारी 1,19,875 1,29,780
फेब्रुवारी 1,13,143 1,33,026
ऑटोमोबाईल क्षेत्रातून रिकव्हरी
अर्थ मंत्रालयाकडून यादी जाहीर करताना म्हटलंय की, फेब्रुवारी महिना 28 दिवसांचाच आहे. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये कोरोना महामारीच्या ओमिक्रॉन संसर्गामुळे, राज्यांनी आंशिक लॉकडाऊन, रात्री कर्फ्यू आणि निर्बंध देखील पाळले. दरम्यान जीएसटी संकलनाने 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. त्याच वेळी, प्रथमच, जीएसटी सेस संकलन 10,000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. कारण ऑटोमोबाईल क्षेत्रातून रिकव्हरी परत आल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia-Ukraine War : 'धोका वाढला, आजच कीव्ह सोडा', भारतीयांसाठी दूतावासाचा इशारा
- Russia Ukraine Crisis : युक्रेन युरोपियन संघात सामील होण्यासाठी अर्ज, सदस्यत्वाची प्रक्रिया इतकी सोपी आहे का? जाणून घ्या