Mutual Fund Aadhar card link : म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणुकीवर लोकांचा विश्वास झपाट्याने वाढला आहे. तुम्हालाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक केले नाही तर तुम्हाला नंतर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे नंतर काढणे कठीण होऊ शकते.
सरकारने जवळपास प्रत्येक गुंतवणूक आणि बँकिंग क्षेत्राशी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. इनकम टॅक्स विभागाअंतर्गत बनविलेल्या नियमांनुसार, आर्थिक क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी तुमचे आधार आणि पॅन लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
लिंक केल्याशिवाय पैसे काढता येणार नाही
जर तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले असतील, तर तुमच्यासाठी दोन गोष्टी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमची पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) तुमच्या पॅन कार्डशी लिंक करायची आहे. त्याचबरोबर, तुम्हाला SIP साठी KYC देखील करावे लागेल. केवायसी आणि पॅन कार्ड शिवाय, तुम्ही तुमचे गुंतवलेले पैसे काढू शकणार नाही.
आधार आणि पॅन कार्ड लिंक करा
इनकम टॅक्स विभागाने सर्व लोकांना लवकरात लवकर आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. तुम्ही असे न केल्यास 31 मार्च 2022 रोजी तुमचे पॅन कार्ड अवैध होईल. 31 मार्च नंतर तुम्ही तुमचा पॅन वापरू शकणार नाही. तसेच, 31 नंतर, दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड देखील भरावा लागेल.
असे म्युच्युअल फंडना आधारशी लिंक करा
- यासाठी तुम्हाला https://eiscweb.camsonline.com/plkyc वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, तुम्ही गुंतवणुकीचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
- त्यानंतर आधार लिंक फॉर्म भरा. तसेच तुमचा पॅनकार्ड क्रमांकही भरा.
- आता हा फॉर्म सबमिट करा.
- यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या नंबरवर ओटीपी येईल, त्यानंतर तो भरा.
- तुमचा म्युच्युअल फंड आधार कार्ड लिंक होईल.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
- SCSS, PPF, NSC, विमा, इक्विटी आणि MF मध्ये नॉमिनीसाठी काय नियम? गुंतवणूकदाराच्या मृत्यूचा परताव्यावर काय परिणाम? जाणून घ्या सविस्तर
- नियमांत बदल; 20 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना E-Invoice
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha