Russia-Ukraine Conflicts : 'आजच कीव्ह सोडा', भारतीय दूतावासाने सूचना दिल्या आहेत. कीव्हमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy In Ukraine) भारतीयांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारतीय नागरिकांना आज कोणत्याही मार्गाने कीव्हमधून (Kyiv) बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.
'कीवमधील भारतीयांसाठी सल्ला..
भारतीय दूतावासाने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, 'कीव्हमधील भारतीयांसाठी सल्ला.. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव्ह सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधीच उपलब्ध असलेल्या गाड्यांद्वारे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध मार्गाने त्वरित हा देश सोडायला सांगितला आहे.
कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया चांगलाच आक्रमक
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला जे काही मिळेल ते वापरून कीव्ह सोडण्यास सांगितले आहे. कीव्हमध्ये रशियन सैनिक सोमवारी रात्रीपासून सतत बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. सततच्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. त्यामुळेच भारतीय दूतावासाने घाईघाईत अॅडव्हायझरी जारी केली आहे.
रशियन सैन्य करणार शक्य ती सर्व मदत
युक्रेनच्या पोलिसांनी काही भारतीयांवर केलेल्या हल्ल्याच्या वाढत्या धोक्यानंतर आणि हल्ल्याच्या घटनेनंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये युक्रेनमध्ये जे भारतीय अडकले आहेत, त्यांनी रशियन सैनिकाशी संपर्क साधावा, असे म्हटले होते. रशियन सैन्य त्यांना शक्य ती सर्व मदत करतील आणि युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतील. रशियाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीत आणखी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha