Tax Collection: पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असताना कर संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (Gross Direct Tax Collection) मोठी वाढ झाली आहे. 10 जानेवारीपर्यत प्रत्यक्ष कर संकलनात 24.58 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. प्रत्यक्ष कर संकलनाचा (Tax Collection) आकडा हा 14.71 लाख कोटींपर्यंत पोहचला आहे. 


या कर संकलनात वैयक्तिक आयकराचा मुख्य वाटा आहे. सरकारने आज आकडेवारी जाहीर केली. रिफंड एडजस्ट केल्यानंतर थेट कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये इतका झाला. मागील वर्षीच्या तुलनेत 19.55 टक्क्यांनी अधिक आहे. हे निव्वळ संकलन चालू आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकरमध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.






CBDT ने काय सांगितले?


केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनातील सुरुवातीचे आकडे हे कर संकलनातील वाढ दर्शवत आहे. या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 14.71 लाख कोटी रुपये इतके होते. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 24.58 टक्के इतके आहे. 


2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा 


1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत 58.74 टक्के जास्त आहे. परतावा समायोजित केल्यानंतर, CIT संकलनातील निव्वळ वाढ 18.33 टक्के आहे आणि PIT मधील निव्वळ वाढ (Security Transaction Tax) 20.97 टक्के आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: