Me Vasantrao Movie : 'द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' (Academy of Motion Picture Arts and Sciences) कडून 95 व्या ऑस्कर (Oscar 2023) पुरस्कार नामांकनासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगभरातील 300 हून अधिक सिनेमांच्या यादीत जीओ स्टुडिओजच्या 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या चित्रपटाचा समावेश झाला आहे.


संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानला मानला जातो. जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल 300 हून अधिक सिनेमांच्या यादीत भारतातील 'कांतारा', 'गंगूबाई काठियावाडी', 'द कश्मीर फाईल्स' बरोबरच 'मी वसंतराव' या मराठी सिनेमाचा समावेश होणं मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाची बाब आहे.




'मी वसंतराव' या सिनेमाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) म्हणाला,"मी वसंतराव' या सिनेमावर आम्ही तब्बल नऊ वर्षे काम केलं आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्कर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे".  


गायक-अभिनेता राहुल देशपांडे (Rahul Deshpande) म्हणाला,"आपण केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी सिनेमा व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. मी वसंतराव' हा सिनेमा एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा सिनेमा अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे".


संबंधित बातम्या


Oscars 2023:  द कश्मीर फाईल्स ते मी वसंतराव; 'हे' चित्रपट ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत; 25 जानेवारीला नामांकनाची यादी होणार जाहीर