Budget 2023-24 Income Tax: अर्थसंकल्पाचा दिवस (Budget 2023-24) जवळ येत असून दुसरीकडे यासोबतच आयकराशी संबंधित कामांनाही जोर आला आहे. कार्यालयात काम करणाऱ्यांकडून गुंतवणुकीचे पुरावे मागवले जात आहेत. गुंतवणुकीच्या पुराव्याच्या आधारे पुढील महिन्यात तुमचा पगार पूर्ण येईल की कमी येईल हे ठरवले जाईल. जर तुम्ही कर बचतीचा पुरावा सादर (Investment Declaration) केला नसेल, तर इन्कम टॅक्स (Income Tax) कापून तुमच्या खात्यात पगार जमा होईल. गुंतवणुकीच्या पुराव्यासाठी, तुम्ही कुठे गुंतवणूक (Investment Proof) केली आहे याचा पुरावा सादर करावा लागेल. कर्मचाऱ्याला प्रथम  त्याच्या कार्यालयात माहिती द्यावी लागेल की तो कुठे गुंतवणूक करत आहे. त्यानंतर जानेवारीत त्याचे पुरावे सादर करावे लागतात. 

आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1,50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. म्हणजेच, या कलम 80C अंतर्गत, तुम्ही विविध गुंतवणूक करून तुमचे एकूण करपात्र उत्पन्न 1,50,000 रुपयांनी कमी करू शकता. यामध्ये जीवन विमा पॉलिसी पावती, ULIPo मधील प्रीमियमचा पुरावा, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ELSS) मधील गुंतवणूक, PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NSC मधील गुंतवणूक, आरोग्य विमा आदीतील गुंतवणुकीत तुम्हाला करसवलत मिळू शकते. 


आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सूट दिली जाते. तुम्ही कोणत्याही वर्षात वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा करायला विसरलात, तर नंतर तुम्ही आयकर रिटर्न भरून कर सवलतीचा दावा करू शकता.


या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ


कर वाचवण्यासाठी, कलम 80C अंतर्गत, तुम्ही म्युच्युअल फंड टॅक्स फंड (ELSS), बँकेच्या कर बचत मुदत ठेव योजना, NPS, PPF, जीवन विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. दोन मुलांच्या ट्यूशन फीवर देखील कर सूट उपलब्ध आहे. यासाठी शाळेने दिलेले फी प्रमाणपत्र द्यावे लागेल. कलम 80C अंतर्गत हा एकमेव खर्च आहे जो गुंतवणुकीच्या कक्षेत येत नाही.


जर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवायची असेल, तर तुम्हाला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या कालावधीत तुम्ही ज्या वर्षी गुंतवणूक कराल, त्याच वर्षासाठी तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. कोणत्या योजनेत किती गुंतवणूक करायची, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे दीड लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे. तुम्ही एवढी रक्कम एकाच ठिकाणी गुंतवणूक करू शकता. अथवा विविध योजनांमध्ये (विमा, पीपीएफ, ELSS) गुंतवू शकता.