एक्स्प्लोर

Gratuity New Rule : 5 वर्षांची अट संपली! आता एका वर्षाच्या नोकरीतही मिळणार ग्रॅच्युइटी, कामगारांसाठी मोठा दिलासा

Labour Code Gratuity New Rule : नवीन लेबर कोडनुसार फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना आता फक्त एका वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटी मिळणार असून 5 वर्षांच्या अटीत मोठा बदल करण्यात आला आहे.

मुंबई : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन लेबर कोडनुसार ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता फक्त एका वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार आहे. याआधी यासाठी किमान 5 वर्षांची अट होती.

Fixed Term Employees Rule : फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

नवीन नियमांनुसार ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयी’ (FTE) म्हणजेच ठराविक कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट कंपनीच्या पेरोलवर घेतलं जाणार आहे. यामुळे त्यांना पगार, सुट्ट्या आणि भत्ते हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार आहेत.

Gratuity Eligibility : एका वर्षातच ग्रॅच्युइटी पात्रता

Payment of Gratuity Act, 1972 नुसार याआधी 5 वर्षांची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅच्युइटी मिळत होती. मात्र आता FTE कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला त्या कालावधीप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळणार आहे.

उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 वर्ष 5 महिने काम केलं असेल, तर तुम्हाला 17 महिन्यांची ग्रॅच्युइटी मिळेल. मात्र एक वर्ष पूर्ण होणं अनिवार्य आहे.

Salary Structure Impact : बेसिक सॅलरी वाढणार

नवीन लेबर कोडनुसार, कर्मचाऱ्यांच्या एकूण CTC मधील किमान 50% रक्कम ही बेसिक सॅलरी असणं आवश्यक आहे. HRA, ट्रॅव्हल अलाउन्स यांसारखे भत्ते 50% पेक्षा जास्त असतील, तर अतिरिक्त रक्कम बेसिकमध्ये जोडली जाईल. त्यामुळे बेसिक सॅलरी वाढेल आणि त्याचा थेट फायदा ग्रॅच्युइटी आणि PF वर होणार आहे.

Quick Settlement Rule : 48 तासांत पैसे मिळणार

नवीन नियमांनुसार, कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर कंपनीला 48 तासांच्या आत फुल अँड फायनल सेटलमेंट (F&F) करावं लागणार आहे. यामध्ये ग्रॅच्युइटी आणि इतर थकबाकीचा समावेश असेल. याआधी ही प्रक्रिया 30 ते 60 दिवस चालायची.

Why Rule Changed : नियम का बदलले?

हे बदल विशेषतः प्रोजेक्ट-बेस्ड किंवा अल्पकालीन कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि 5 वर्षांची प्रतीक्षा करावी लागू नये, हा यामागचा उद्देश आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget